Manasvi Choudhary
सध्या प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहेत. पर्सनल आयुष्यामुळे ते लक्ष वेधून घेत आहेत.
अलीकडेच इंदुरीकर महाराजांची लेक म्हणजेच ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा झाला. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
इंदोरीकर महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रभर किर्तन करतात. त्याच्या किर्तनाचे लाखो चाहते आहेत.
मात्र तुम्हाला माहितीये का? इंदोरीकर महाराज यांचे खरं नाव वेगळं आहे.
इंदुरीकर महाराज यांचे मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्याचं गाव आहे.
इंदोरी या त्यांच्या गावाच्या नावावरून इंदोरीकर महाराज असं नाव पडलं आहे.