Manasvi Choudhary
हिवाळ्यात वातावरण थंड असते यामुळे शरीराला उष्ण वाटणाऱ्या पदार्थाचे सेवन केले जाते.
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू अधिक खाल्ले जातात. डिकांचे लाडू घरी बनवण्याची पद्धत सोपी आहे.
डिंकाचे लाडू बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, डिंक, तूप, गूळ , सुके खोबरे, ड्रायफ्रुट्स, खसखस, वेलची पावडर हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम डिंकाचे लाडू बनवण्यासाठी कढईमध्ये तूप घाला. तूप साधारण गरम झाल्यावर त्यात डिंक टाका.डिंक कच्चा राहणार नाही याची काळजी घ्या. डिंक नंतर एका प्लेटमध्ये काढा.
पुन्हा कढईमध्ये तूप घालून त्यात गव्हाचे पीठ मध्यम आचेवर भाजून घ्या. भाजलेले पीठ एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवा नंतर त्यात सुके खोबरे हलके भाजून घ्या.
गॅसवर एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, तळलेले डिंक, भाजलेला सुका खोबरा आणि खसखस, ड्रायफ्रुट्स मिक्स करा.
नंतर या मिश्रणात गूळ आणि पाणी मिक्स करून त्याचा पाक तयार करा. मिश्रणात वेलची पूड मिक्स करा.
मिश्रण कोमट असताना त्याचे गोलाकार लाडू वळून घ्या अशाप्रकारे डिंकाचे लाडू खाण्यासाठी तयार होतील.