Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकच्या नावाचा सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली आहे.
इन्स्टाग्रामवर गिरीजाने तिचं मार्केट गाजवलं आहे. सौंदर्य हे तिच्या चर्चेत असण्यामागचं कारण आहे.
नुकतीच गिरिजाने एक मुलाखत दिली होती यावेळचा तिचा लूक नेटकऱ्यांना भावला आहे.
गिरीजाने निळी कॉटनची साडी नेसली होती. साडीवर तिने मॅचिंग पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
अत्यंत सिंपल अश्या लूकमध्ये ती दिसत आहे. तिने केस मोकळे ठेवले आहेत. गिरीजाचा हा लूक पाहून तिचे चाहतेच नाही तर अनेक युजर्स तिच्यावर फिदा झाले आहेत.
गिरीजाच्या या फोटोवर 'नॅशनल क्रश' अश्या कमेंट देखील आल्या आहेत.