Manasvi Choudhary
चेहरा किती सुंदर असला तरी प्रत्येक महिला व पुरूषांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ दिसतात डोळ्याखाली काळी वर्तुळे येणं ही सामान्य समस्या आहे.
रात्री उशिरा झोपणे, सतत मोबाईल पाहणे, तणाव कमी करणे यांमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल येतात.
मात्र काही घरगुती उपायांनी डोळ्यांखालील काळी वर्तुळे तुम्ही सहजरित्या कमी करू शकता.
रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेल कोमट करून डोळ्याखाली लावा.
काकडी पातळ कापून डोळ्यांवर ठेवा असे केल्याने डोळ्याखालील डार्क सर्कल कमी होतात.
कोरफडचा गर डोळ्याखाली लावल्यानंतर मालिश करा यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
नारळाच्या तेलाचा आयुर्वेदिक उपयोग होतो. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली नारळ तेलाने हलके मालिश करा.
दुधाची साय त्वचेसाठी फायदेशीर आहे. तुम्ही डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी दुधाची साय लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ल घ्या.