Manasvi Choudhary
पनीर चिली अनेकांचा आवडता पदार्थ आहे. शाकाहारी पदार्थ यामध्ये जर काय खायचे असेल तर अनेकजण पनीर चिली निवडतात.
गावरान स्टाईल पनीर चिली बनवायची असेल तर रेसिपी सोपी आहे.
पनीर चिली बनवण्यासाठी पनीर, कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदा, आले- लसूण, मैदा, टोमॅटो पेस्ट, सॉस, मीठ, हळद, मसाला हे साहित्य एकत्र करा.
गावरान स्टाईल पनीर चिली बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे बारीक तुकडे करा त्यात मैदा मिक्स करून मसाला, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून तळून घ्या.
एका भांड्यात मक्याचे पीठ, मिरची आणि मीठ यांची एकत्र पेस्ट बनवून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये आले- लसूण, कांदा, मिरची परतून घ्या.
या मिश्रणात टोमॅटो चटणी, हिरवी मिरची पेस्ट, आले - लसूण पेस्ट हे परतून घ्या.
संपूर्ण मिश्रण चांगले शिजवून घ्या नंतर त्यात तळलेले पनीर टाका आणि मिक्स करा. १० ते १५ मिनिटे झाल्यानंतर पनीर चिली तयार होईल ती गरमागरम सर्व्ह करा.