Manasvi Choudhary
थंडीच्या दिवसांमध्ये ओठांची विशेष काळजी घ्यावी लागते.
थंडीत ओठ कोरडे पडण्याची समस्या फारच त्रासदायक वाटते.
बाजारातील केमिकलयुक्त लिपबाम न वापरता तुम्ही घरच्याघरी लिपबाम तयार करू शकता.
गुलाबाच्या पाकळ्या, खोबरेल तेल, पेट्रोलियम जेल यांचे लिपबाम तयार करा गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून त्या पाण्यात घाला.
गॅसवर एका भांड्यात हे भिजवलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांना उकळी द्या. तुम्हाला जर ओठांचा रंग गुलाबी हवा असेल तर तुम्ही यात बीटरूट देखील मिक्स करू शकता.
या मिश्रणात पाणी, व्हॅसलिन आणि मध हे मिश्रण मिक्स करा. व्हॅसलिन आणि खोबरेल तेल टाकण्यापूर्वी ते गरम करून वितळून घ्या.
नंतर हे संपूर्ण मिश्रण एका छोट्या डबीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. जवळपास ८ ते १० तास तयार केलेले लिपबाम चांगले सेट होईल.
थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही आठवड्यातून दोन दिवस मध आणि साखरेने ओठांना स्क्रब करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.