Manasvi Choudhary
आवळा हा आयुर्वेदिक आहे. निरोगी आरोग्यासाठी आवळा खाल्ला जातो. जेवण केल्यानंतर आवळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
मात्र तुम्हाला आवळा नुसता खायला आवडत नसेल तर तुम्हाला आम्ही एक रेसिपी सांगणार आहोत. आवळ्याचा लोणचा तुम्ही घरगुती पद्धतीने बनवू शकता.
आवळा लोणचे बनवण्यासाठी तुम्हाला आवळे, मीठ, तेल, मोहरी तेल, हिंग, मेथी दाणे, ओवा, जीरे, हळद हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून त्याचे बारीक बारीक तुकडे करा.
गॅसवर एका भांड्यात बारीक केलेले आवळ्याचे तुकडे वाफवून घ्या. आवळा शिजल्यानंतर ते थंड करा
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये हिंग, मेथीदाणे, हळद, ओवा आणि जिरे परतून घ्या.
संपूर्ण मिश्रणात मोहरी आणि मीठ मिक्स करा आणि ढवळून घ्या. सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर त्यात आवळा मिक्स करा आणि लाल मिरची घाला.
आता आवळा आणि सर्व मसाले एकत्र करा. अशाप्रकारे हे तयार आवळा लोणचे तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता.