Manasvi Choudhary
भारताची राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे.
लाल किल्ला हा भारताची शान आहे. १५ ऑगस्ट १९४७ साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत जेव्हा मुक्त झाला.
तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सर्वात पहिल्यांदा ध्वजारोहण केले होते.
दिल्लीतील लाल किल्ला १६३८ मध्ये बादशहा शहाजहान यांनी बांधला होता. त्यानंतर मुघलांची राजधानी अग्राहून दिल्लीला हलवण्यात आली.
लाल किल्ला बांधण्यासाठी लाल वाळूच्या दगडाच्या वापर केला गेला यावरूनच किल्ल्याला 'लाल किल्ला' असे नाव पडले.
दिल्लीचा लाल किल्ला बांधण्यासाठी सुमारे १ कोटी रूपये खर्च लागला होता. लाल किल्ल्याला लहार गेट आणि दिल्ली गेट असे दोन प्रवेशद्वार आहेत.
दिल्लीच्या मध्यभागी म्हणजेच यमुना नदीजवळ लाल किल्ला बांधण्यात आला. किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी यमुना नदी वेढलेली आहे.