Manasvi Choudhary
बॉलिवूडसह हिंदी सिनेविश्वात आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलेले अभिनेते म्हणजे धर्मेंद्र.
धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
वयाची साठ वर्षाहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत घालवला आहे. ३०० हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
धर्मेंद्र हे निसर्गाच्या सानिध्यात आयुष्य घालवत होते. मुंबई येथील बंगल्यात देखील ते जास्त राहत नव्हते.धर्मेंद्र यांच्याकडे बंगले, अलिशान कार आहेत. करोडो संपत्तीचे मालक धर्मेंद्र आहेत.
धर्मेंद्र याचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस देखील आहे. 1983 मध्ये त्यांनी Bijayta Films ची सुरूवात केली.
धर्मेंद्र हे करोडे रूपयांचे मालक आहेत तुम्हाला माहितीये का त्यांची एकूण संपत्ती किती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 450 कोटी रूपये इतकी आहे.