Bangladeshi Women Come Noida For Her Husband : सात समंदर पार मैं तेरे पीछे-पीछे आ गई...हे विश्वात्मा या चित्रपटातलं गाणं. रील लाइफमधल्या या गाण्यातल्या ओळी आता रील लाइफमध्येही खऱ्या ठरत असल्याचं पाहायला मिळतं.
'सीमा हैदर एक प्रेमकथे'नंतर सानिया-सौरभची दुसरी प्रेमकथा समोर आली आहे. पण या कथेत अनेक ट्विस्ट येत आहेत. प्रेमासाठी सानिया हद्द ओलांडून अर्थात बांगलादेशातून थेट भारतात आली. पण प्रियकरानं तिला स्वीकारण्यास नकार दिला.
प्रियकरासाठी उत्तर प्रदेशातील नोएडा येथे बांगलादेशातून आलेल्या महिलेकडून एकावर एक धक्के देणारे खुलासे होत आहेत. आता २९ वर्षीय सानिया आणि तिचा प्रियकर सौरभचा एक फोटो समोर आला आहे. एका हिंदी वृत्त संकेतस्थळाच्या हाती हे फोटो लागले आहेत. त्यात सौरभने बांगलादेशात इस्लाम स्वीकारल्याचा आणि त्यांच्या लग्नाचे फोटोही आहेत.
देशाच्या सीमा ओलांडून पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर प्रकरणानंतर अनेक प्रेमकथा समोर येऊ लागल्या आहेत. सानियाही बांगलादेशातून व्हिसा घेऊन (कथित) पती सौरभला भेटण्यासाठी भारतात आली आहे.
सानिया आणि सौरभने तीन वर्षांपूर्वी बांगलादेशात लग्न केले होते. त्यानंतर त्यांना एक मूल झाले आहे. सानिया आता मुलाला सोबत घेऊन नोएडात आली आहे, असे सांगितले जाते. धक्कादायक म्हणजे नोएडात आल्यानंतर तिला धक्काच बसला. सौरभने दुसरे लग्न केल्याचे समोर आले आहे.
सौरभनं तिचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. पण तिला सौरभची साथ सोडायची नाही. आता हे प्रकरण नोएडा पोलिसांत गेलं आहे. सानियाने सोमवारी मुलासह सेक्टर १०८ पोलीस आयुक्त कार्यालय गाठले. पोलिसांकडे तिने मदत मागितली. त्यांना विनंती केली.
बांगलादेशात नोकरीसाठी गेला होता सौरभ
सानियाच्या दाव्यानुसार, १४ एप्रिल २०२१ ला सौरभसोबत तिचे लग्न झाले. लग्नानंतर तो तिला सोडून भारतात आला. चौकशीदरम्यान तो विवाहीत असल्याचे समजले. ढाका येथे तो नोकरी करायचा. या कालावधीत सानिया आणि सौरभची भेट झाली. त्यानंतर त्या दोघांनी गुपचूप लग्न केले होते.
आता सानियाचा आणि तिच्या मुलाचा पासपोर्ट आणि नागरिक ओळखपत्र (सिटीझन कार्ड) गौतम बुद्ध नगर जिल्हा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.