Nashik Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

BJP Gains Strength In Nashik: नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नाशिकमध्ये भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला. बड्या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Nashik Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
BJP Gains Strength In NashikSaam Tv
Published On

Summary -

  • नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली

  • नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला

  • माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला

  • गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढत चालली आहे. कारण भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश मिळत आहे. इतर पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू आहे. अशातच नाशिकमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक पाहायला मिळाल. भाजपने काँग्रेसला जोरादर धक्का दिला. काँग्रेसच्या बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या चांदवड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी आज काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिकमध्ये भाजप कार्यालयात शिरीष कोतवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शिरीष कोतवाल यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

Nashik Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर

या पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान गिरीश महाजन यांनी शिरीष कोतवालांची चांगलीच फिरकी घेतली. कोतवाल तुम्ही फक्त काँग्रेसमध्ये होते ना? या गिरीश महाजनांच्या प्रश्नावर कोतवाल यांनी राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना आणि नंतर काँग्रेस असं सांगताच महाजन यांनी डोक्याला हात लावत आता भाजप हा शेवटचा पक्ष आहे तुम्ही मुख्य प्रवाहात आले आहात, पुढे कुठे जाऊ नका असं म्हणाले. गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात सर्वजण हासू लागले.

Nashik Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
Beed Politics : बीडमध्ये मुंडे भावाबहिणीची युती, परळी नगरपरिषद राखण्यात यश मिळणार का? VIDEO

दरम्यान, नाशिकमध्ये पहिल्यांदा भाजपला धक्का बसला होता. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचा नवरा हेमंत गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले हे इनकमिंग शिवसेना ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदाच पक्षात इनकमिंग होत असल्याने शिवसेनेला पक्ष मजबुतीसाठी फायदा होणार आहे.

Nashik Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
Nashik Municipal Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, तुरुंगातील ३ महायुतीच्या नेत्यांना दिलासा, पण भवितव्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com