Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर

NCP Star Campaigners List: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये छगन भुजबळांना स्थान नाही. तर धनंजय मुंडे यांचे नाव आहे.
Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर
NCP Star Campaigners ListSaam Tv
Published On

Summary -

  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर

  • एकूण ४० नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली

  • मंत्री छगन भुजबळ यांचं नाव या यादीतून वगळण्यात आलं

  • धनंजय मुंडे यांचं नाव ५व्या क्रमांकावर आहे

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता स्टार प्रचारकांची यादी देखील तयार केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारा गटाने स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली. या स्टार प्रचारकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केली. राष्ट्रवादीकडून जवळपास ४० जणांची स्टार प्रचार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आमदार धनंजय मुंडे यांचे नाव आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ यांचे नाव वगळण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव गायब आहे. मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा स्टार प्रचारकाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या प्रवक्त्यांच्या यादीतून नाव वगळल्यानंतर आमदार अमोल मिटकरींची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरातील मंत्री, आमदार आणि नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांचा देखील समावेश आहे.

Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर
Maharashtra Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, ४ वेळा आमदार आणि मंत्री राहिलेला नेता अजित पवार गटाच्या वाटेवर

राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील - चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक यांचा समावेश आहे.

Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर
Maharashtra Politics: दोंडाईचामध्ये डाव साधला; शरद पवार गटात खिंडार, तीन मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

त्याचसोबत नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक - शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर या सर्व ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर
Maharashtra Politics: भाजपचा मास्टरस्ट्रोक, NCP शरद पवार गटाला झटका; बड्या नेत्यासह सरपंच-उपसरपंचांनी हाती घेतलं 'कमळ'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com