Maharashtra Fourth Women Policy: महिलांसाठी महत्वाची बातमी; राज्यात चौथं महिला धोरण येणार; अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Fourth Women Policy: चौथं महिला धोरण राज्य सरकार आणणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar Newssaam tv

Ajit Pawar News: राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. बदलत्या काळानुसार महिलांच्या नव्या प्रश्नावर आधारीत चौथं महिला धोरण राज्य सरकार आणणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांनी ही माहिती दिली. (Latest Marathi News)

अजित पवार चोथ्या महिला धोरणाविषयी काय म्हणाले?

महिला धोरणाबद्दल अजित पवार म्हणाले, 'राज्यात पहिलं महिला धोरण हे १९९४ साली आलं. त्यानंतर २००१ साली दुसरं, तर २०१४ साली तिसरं महिला धोरण आणण्यात आलं. त्यानंतर आता राज्य सरकार चौथं महिला धोरण २०२३ आणलं जाणार आहे, असे पवार म्हणाले.

Ajit Pawar News
Maharashtra Politics: 'शरद पवारांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली; तुम्ही काय केलं?' राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

'या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी सुचवल्यानंतर वेगवेगळ्या महिला संघटना,सहकारी महिलांचं मत जाणून घेतलं, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, 'चौथं महिला धोरण याआधीच आणायचं होतं. मात्र, काही कारणामुळं विलंब झाला. त्यावेळी यशोमती ठाकूर यांच्याकडे खातं होतं. त्यानंतर मंगलप्रसाद लोढा त्या खात्याचे मंत्री झाले आणि आता आदिती तटकरे झाल्या आहेत'.

Ajit Pawar News
MNS Tweet On Ravindra Chavan: 'झोपेचं सोंग घेऊन जबाबदारी झटकणाऱ्यांना...', मुंबई-गोवा महामार्गावरुन मनसेचे रविंद्र चव्हाणांना प्रत्युत्तर

'चौथं महिला धोरण विचारपूर्वक राज्यात आणण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. या धोरणाचं प्रेझेंटेशन संबंधित विभागाने मला आणि मुख्यमंत्र्यांना दिलं. यावेळी विभागाचे सचिव आणि आयुक्त उपस्थित होते. त्यांची एक कमिटी पण तिथं उपस्थित होती, असंही पवार यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com