Gyanesh Kumar Saam Tv
देश विदेश

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार १० ऑक्टोबरच्या आधी राजीनामा देतील, बड्या राजकीय नेत्याचा दावा

Gyanesh Kumar Resignation: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार १० ऑक्टोबरपूर्वी राजीनामा देतील असा मोठा दावा आम आदमी पार्टीच्या नेत्याेने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Priya More
  • ज्ञानेश कुमार १० ऑक्टोबरपूर्वी राजीनामा देतील

  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत सौरभ भारद्वाजांचा मोठा दावा

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी

  • १० ऑक्टोबरला जंतर मंतरवर ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचे आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशातील विरोधी पक्ष आणि जनता आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांमधील नेते सहभागी झाले आहेत. अशातच आता आम आदमी पार्टीचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ज्ञानेश कुमार यांच्यासंदर्भात मोठा दावा केला. येत्या १० ऑक्टोबरच्या आधी ज्ञानेश कुमार हे राजीनामा देतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सौरभ भारद्वार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सूत्रांनी त्यांना माहिती दिली आहे की १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतर येथे ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. जून-जुलैमध्ये, नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केले होते. जंतर मंतरवर महिनाभर चाललेल्या आंदोलनाचे अभिजीत दीपकेने नेतृत्व करून धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते.

स्वतःला 'जनरेशन जी'ची संघटना म्हणणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सीजेपीने आंदोलन केले. या आंदोलनानंतर आता सीजेपीने १० ऑक्टोबर रोजी जंतर मंतरवर आंदोलनाची घोषणा केली आहे. सीजेपीचा दावा आहे की, या आंदोलनासाठी देशभरातून लोक एकत्र जमतील आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आम आदमी पक्षाने आता असा दावा केला आहे की, ज्ञानेश कुमार जंतर मंतर २.० च्या आधी राजीनामा देतील. सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी सोशल मीडियावर एका सूत्राचा हवाला देत हा दावा केला. दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सौरभ भारद्वार यांनी सांगितले की, 'माझ्या सूत्राने सांगितले की ज्ञानेश कुमार १० ऑक्टोबरपूर्वी राजीनामा देऊ शकतात.' भारद्वाज यांनी आपल्या पोस्टमध्ये याबाबत अधिक माहिती दिली नाही पण त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: नवी मुंबई एअरपोर्टवरून थेट पुण्याला जा, ई-बस सेवा होणार सुरू; तिकीटासाठी किती मोजावे लागणार?

Breaking News : पोटनिवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा! मतदानानंतर उमेदवाराला केली अटक; नेमकं काय घडलं?

Health Tips : उशिरा उठता आणि व्यायामही करत नाही? शरीरात होऊ शकतात 'हे' गंभीर बदल, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Maharashtra News Live Update: प्रियंका गांधी आणि राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

दिल्लीतील वातावरण तापले! राहुल गांधींचा गनिमी कावा, आयोगात जाण्यासाठी लढवली शक्कल, थेट आकाशवानी भवनात पोहोचले अन्...

SCROLL FOR NEXT