Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC खरंच सुरू झाली का? खरं काय, खोटं काय? सरकारनं दिली योग्य माहिती

Ladki Bahin e-KYC Online : लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, सरकारने अद्याप ई-केवायसीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana meta ai
Published On: 

Ladki Bahin Yojana e-KYC latest update : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सुरू झाल्याचे व्हिडीओ, फोटो आणि मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या मेसेजनंतर राज्यातील अनेक महिलांनी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ladakibahin.maharashtra.gov.in जाऊन मोबाईलवरून प्रयत्न सुरू केले आहेत, तर गावागावांतील महा ई-सेवा आणि सेतू केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. मात्र, राज्य सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून, हे सर्व दावे पूर्णपणे खोटे असल्याचे समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोमवारपासून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. या माहितीमुळे लाभार्थी महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आपला हप्ता अडकू नये या भीतीने अनेक महिला तातडीने सेतू केंद्रांवर धाव घेत होत्या. पण त्यांच्या पदरी निराशाच येत होती.

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

सरकारने ई-केवायसी सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा किंवा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सेतू केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन या व्हायरल दाव्यांबाबत मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी केले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात सध्या कोणतीही नवीन नोंदणी प्रक्रिया किंवा ई-केवायसी सुरू नाही. त्यामुळे कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवून महा ई-सेवा किंवा सेतू केंद्रांवर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो सावधान! e-KYC च्या नावाने फसवणूक, प्रशासनाने दिला मोठा इशारा

नोंदणी किंवा ई-केवायसीबाबत शासनस्तरावरून कोणतीही अधिकृत सूचना आल्यास ती जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत अधिकृतरीत्या कळवली जाईल. तसेच, मोबाईलवर ई-केवायसी किंवा नोंदणीसंदर्भात कोणतीही बनावट लिंक आल्यास त्यावर अजिबात क्लिक करू नका. लिंकवरील प्रक्रियेदरम्यान प्राप्त झालेला कोणताही ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नका, अन्यथा तुमची मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे महत्त्वपूर्ण आवाहन नागपूर जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी 'साम टीव्ही'शी बोलताना केले आहे.

Ladki Bahin Yojana
ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता 'या' दिवशी होणार जमा, वाचा मोठी अपडेट

सायबर फसवणुकीचा धोका

ई-केवायसी करण्याच्या घाईत काही महिला सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करण्याची शक्यता आहे. अशा लिंकद्वारे सायबर चोरटे वैयक्तिक माहिती चोरून बँक खाते रिकामे करू शकतात. त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत माहिती दिली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा कोणाशीही आपली बँक माहिती शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.