बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्यामुळे महाराष्ट्रात नवा राजकीय वाद
सोनिया गांधींच्या पुस्तकाविरोधात शिंदेसेनेचे आंदोलन
मुंबई महापालिकेत ठाकरेसेनेचा निषेध मोर्चा
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत शिंदेसेनेनं पत्रकार परिषदेत घेत निषेध व्यक्त केला. मात्र निषेधाची दखल घेतली जावी म्हणून शिंदेसेनेच्या नेत्यांनी भर पत्रकार परिषदेत सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रतीच फाडल्या. मात्र निषेधासाठी पुस्तक फाडण्याच्या हा अभिनव निषेध शिंदेसेनेच्या चांगलाच अंगलट आला.
पुस्तक फाडण्याच्या नादात शिंदेसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सायना एनसींनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो फाडला. मणिशंकर अय्यरांनी सावरकरांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन केलं होतं. त्याच आंदोलनातील फोटो दाखवत शायना एनसींनी तो फोटो थेट भर पत्रकार परिषदेत फाडला.
या घटनेचे व्हिडिओ समोर येताच ठाकरेसेना आणि काँग्रेसनं शिंदेसेना आणि शायना एनसींवर टीकेची झोड उठवली. तर उत्साहाच्या भरात अशा चुका करू नये असं सल्ला देत भाजपनं शिंदेसेनेच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. तर सगळीकडून टीका झाल्यानंतर शायना एनसींनी फोटो फाडल्याच्या प्रकरणावर सारसारव करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तरीही ठाकरेसेनेच्या नगरसेवकांनी यावरून मुंबई महापालिकेत जोरदार निषेध नोंदवला. महापालिकेत शायना एनसींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. BMC सभागृहातही ठाकरेसेनेच्या नगरसेवकांची महापौरांसोबत जोरदार खडाजंगी झाली. हे प्रकरण अंगाशी आल्य़ामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही याची दखल घ्यावी लागलीय.ही चूक अजाणतेपणानं झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असला तरी विरोधकांना शिंदेसेनेला घेरण्यासाठी आयतं कोलीत मिळालंय.
त्यामुळे निषेध करायला गेले आणि स्वत:चेच हसू झाले, अशीच स्थिती शिंदेसेनेच्या शायना एनसींची झालीय. सोनिया गांधींनी पुस्तकाच्या रुपात का असेना शिंदेसेनेला घेरण्यासाठी ठाकरेसेनेला मदतच केलेल्या चर्चा आता राजकीय विश्वात रंगू लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.