Vladimir Putin On Cancer Vaccine Saam Tv
देश विदेश

Cancer Vaccine Update: कॅन्सरची लस लवकरच बाजारात येणार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा मोठा दावा

Vladimir Putin On Cancer Vaccine: कॅन्सरची लसही लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे.

Satish Kengar

Vladimir Putin On Cancer Vaccine:

कॅन्सरची लसही लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. ते म्हणाले की, रशियन शास्त्रज्ञ कॅन्सरविरूद्ध लस तयार करण्याच्या जवळ आहेत, जी लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते.

पुतिन यांनी रशियात टेलिव्हिजनवर प्रसारित संदेशात म्हणाले आहे की, "आम्ही कॅन्सर रोगावरील लस आणि नवीन पिढीतील इम्युनोमोड्युलेटरी औषधे तयार करण्याच्या अगदी जवळ आहोत. मला आशा आहे की, लवकरच या वैयक्तिक थेरपीच्या पद्धती प्रभावीपणे वापरल्या जातील. मॉस्को फोरम ऑन फ्यूचर टेक्नॉलॉजीजमध्ये बोलताना ते असं म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही लस कॅन्सरच्या कोणत्या प्रकारासाठी असेल आणि तिचा परिणाम कसा दिसून येईल, याबाबत व्लादिमीर पुतीन यांनी कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, अनेक देश आणि कंपन्या कॅन्सरची लस बनवण्यावर काम करत आहे. गेल्या वर्षी, ब्रिटीश सरकारने कॅन्सरच्या उपचारांसाठी क्लिनिकल टेस्ट सुरू करण्यासाठी जर्मनी येथील बायोएनटेकशी करार केला होता. (Latest Marathi News)

वर्ष 2030 पर्यंत 10,000 रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे त्याचे लक्ष्य आहे. फार्मास्युटिकल कंपन्या मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी देखील प्रायोगिक कॅन्सरच्या लसी विकसित करत आहेत. त्याच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मेलेनोमामुळे (सर्वात प्राणघातक स्किन कॅन्सर) मृत्यूची शक्यता 3 वर्षांच्या उपचारानंतर निम्मी झाली आहे.

भारतात कर्करोगाचे 14.1 लाख नवीन रुग्ण: WHO

भारताबद्दल बोलायचे झाले तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, 2022 मध्ये देशात कॅन्सरच्या 14.1 लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या आजारामुळे 9.1 लाखांहून अधिक मृत्यू झाले. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरएसी) नुसार, ओठ, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग पुरुषांमध्ये सर्वात सामान्य आहे. स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर महिलांमध्ये सर्वाधिक आढळून आला. नवीन प्रकरणांमध्ये त्यांचा वाटा अनुक्रमे 27 आणि 18 टक्के होता. IARC ही WHO ची कॅन्सर आजारावर लक्ष ठेवणारी संस्था आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT