Mumbai News: मुंबईच्या डोंगरीत दहशतवादी घुसल्याचा फोन, पोलिसांनी एकाला केली अटक

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आल्याचं समजतं आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला सांगितले की, काही दहशतवादी मुंबईच्या डोंगरी भागात घुसले आहेत.
Mumbai Police
Mumbai PoliceSaam Tv
Published On

Mumbai Crime News :

मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आल्याचं समजतं आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला सांगितले की, काही दहशतवादी मुंबईच्या डोंगरी भागात घुसले आहेत. हे दहशतवादी शस्त्रांनी सज्ज आहेत.

हा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र चौकशी केली असता फोनवर दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Police
RBI चा Paytm युजर्सला मोठा दिलासा! आता या तारखेपर्यंत वापरू शकता पेटीएम पेमेंट बँक

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात यापूर्वीही असे अनेक खोटी माहिती देणारे फोन कॉल्स आले आहेत. गेल्या आठवड्यातच पोलिस नियंत्रण कक्षाला एक कॉल आला होता. ज्यामध्ये कुलाब्यातील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये 10-11 सशस्त्र पाकिस्तानी घुसल्याचा दावा करण्यात आला होता. (Latest Marathi News)

कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन कुलाबा पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह हॉटेलची कसून झडती घेतली. मात्र कोणताही पुरावा सापडला नाही. यानंतर फोन कॉल निव्वळ अफवा असल्याचे सांगण्यात आले.

Mumbai Police
Prakash Ambedkar: मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, याबाबत माहिती मिळाल्यानंतर ती कुलाबा पोलिस स्टेशनला देण्यात आली, ज्याच्या अखत्यारीत हॉटेल येते. यानंतर स्थानिक पोलिसांनी हॉटेलच्या सुरक्षा प्रमुखांशी संपर्क साधला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसराची झडती घेतली. यानंतर आम्हाला काहीही संशयास्पद आढळले नाही, असं पोलिसांनी सांगितलं होत.

दरम्यान, मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस प्रत्येक क्षणी अलर्ट मोडवर असते. त्यावेळी पाकिस्तानातून अनेक दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते आणि त्यांनी ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 170 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com