Eknath Shinde, Shrikant Shinde, cabinet expansion Saam TV Marathi
देश विदेश

Cabinet expansion : शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना संधी?

Will Shrikant Shinde become Union Minister? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde, Shrikant Shinde, cabinet expansion : राज्याच्या राजकारणातून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात २ मंत्रि‍पदे मिळणार असल्याची माहिती खात्रालायक सूत्रांनी दिली आहे. केंद्रात शिंदेसेनेला 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यताय. खासदार श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणेंची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. पक्षाची ताकद आणि खासदारांचा आकडा वाढवण्यासाठी शिंदेसेनेकडून आता उद्धव ठाकरेंच्या खासदारांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जास्तीत जास्त खासदारांना सोबत घेऊन केंद्रात वजन वाढवण्याचा शिंदेसेनेचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

दिल्लीमधील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (शिंदे गट) दोन मंत्रिपदं मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत आहेत. राज्यसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. काही मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो, तर काही खासदारांना मंत्रि‍पदाच लॉटरी लागू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

ऑपरेशन टायगर का?

खासदारांची संख्या वाढवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खासदारांचा आकडा वाढवून केंद्रामध्ये जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळवण्याचा शिंदे सेनेचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रात दोन मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना नेत्यांनी आतापासूनच हालचाली (लॉबिंग) सुरू केल्या आहेत

श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे शर्यतीत

मंत्रिमंडळ विस्तारात जर शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळाली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. तसेच श्रीरंग बारणे यांचे नावही या शर्यतीत आघाडीवर आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान ठाकरे गटाचे किती खासदार संपर्कात आहेत आणि पुढील राजकीय रणनीती काय असेल, यावर चर्चा झाल्याचे समजते. केंद्रातील या संभाव्य विस्तारामुळे महाराष्ट्रातील राजकारणात शिंदे गटाचे वजन आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Vegetable Juice For Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी दररोज प्या हिरव्या भाज्यांचे ज्यूस, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

Sanitation Workers : ९ वर्षात गटार साफ करताना ६२२ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

Jasprit Bumrah: BCCI मुळे जसप्रीत बुमराहचं २ कोटींचं नुकसान

Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा अपघात, खालापूरजवळ कारचा चेंदामेंदा अन् रक्ताचा सडा, ३ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT