Maharashtra News Live Update: माणगावमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यभरात दिवाळीचा उत्साह, आज धनत्रयोदशी; कोल्हापूरमधील शेतकरी आंदोलन मागे, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात भीषण अपघात 

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मसूरजवळ धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी धुळ्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या या बसला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या दुर्घटनेत तीन चालकांसह 12 प्रशिक्षणार्थी असे एकूण 15 जण जखमी झाले असून मसूर पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलवले आहे. ऊसदर आंदोलनामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळूर महामार्ग रोखल्याने ही बस रहिमतपूर-मसूर मार्गे कराडकडे जात होती. जखमी प्रशिक्षणार्थी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

माणगाव खोऱ्यात आढळला लाल रंगाचा अनोखा 'रेड कॉटन स्टेनर’कीटक!

सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यात लालसर-केशरी रंगाचा अनोखा कीटक आढळून आला आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कीटकामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा कीटक ‘रेड कॉटन स्टेनर’ प्रजातीतील असण्याची शक्यता आहे.

माणगाव डोंगरवाडी येथील एका घराच्या परीसरात आढळलेला हा रंगीत कीटक दिसायला आकर्षक असून, त्याचे लालसर-केशरी शरीर, काळे पाय आणि पंखांवरील वेगळ्या खुणा यामुळे तो सहज लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रातील काही भागात या कीटकाची नोंद असलीतरी निसर्गाच्या विविधतेने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा अनोख्या प्रजातींची नोंद पर्यावरण अभ्यासासाठी महत्त्वाची ठरू शकते.

माणगावमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता

रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. माणगावचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक आनंद यादव आपल्या सहकाऱ्यांसह पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या कार्य पद्धतीवर नाराज असलेले आनंद यादव यांच्यासह माणगावचे तीन विद्यमान आणि चार माजी नगरसेवक देखील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्वजण शिवसेनेच्या वाटेवर असून दिवाळीनंतर पक्षप्रवेशाचा फटाका फुटण्याची शक्यता आहे.

बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणार्‍या वैभव चव्हाणचा मृतदेह आढळला.

खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणणार्‍या नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण या युवकाचा मृतदेह आढळून आला... इमामपुर शिवारात हा मृतदेह आढळल्यानंतर नातेवाईकांनी घातपाताचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे...

घोरण्याच्या कारणावरून नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, एकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

- घोरण्याच्या आवाजामुळे झोपमोड होत असल्याच्या कारणावरून कारागृहातील कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली‌‌.

- या मारहाणीत एका कैद्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- मनिष चैतराम ठाकूर असे जखमी कैद्याचे नाव असून, सतिश राजन पैसाडेली याने त्याला मारहाण केली....

- धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश पैसाडेली झोपेत घोरत असल्याने मनिष ठाकूर याची झोपमोड होत असल्याचा आरोप केला. त्यामुळे मनिषने त्याला झोपेतून उठवून घोरण्याबाबत जाब विचारला.

अजितदादांच्या आठवणींनी माळेगावकर भावूक; कंदिलाच्या माध्यमातून अनोखे स्मरण

माळेगावमध्ये दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अनोख्या आणि भावपूर्ण पद्धतीने उजाळा देण्यात आला. अजितदादांच्या छायाचित्राचा सुंदर कंदील तयार करण्यात आला असून, त्याचे पूजन त्यांचे सुपुत्र युवानेते श्री. जय अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित असलेल्या एका आजींनी जय पवार यांचा हात हातात घेतला आणि दिवंगत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करणारी भावनिक कविता सादर केली. आजींच्या या कवितेतून अजितदादांप्रती असलेली त्यांची आत्मीयता, जिव्हाळा आणि आदरभाव व्यक्त झाला.

बारामतीच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

बारामती : बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ४६ वर्षीय रुग्णाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्ण सहाव्या मजल्यावर असताना नर्सिंग कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तोल गेल्याने ते थेट दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.