Shruti Vilas Kadam
वजन कमी करायचे असेल तर चहा, कॉफी आणि इतर पदार्थांमध्ये जास्त साखर घालणे टाळा. साखरेमुळे शरीरात कॅलरीज वाढतात. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी ठेवा.
कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस आणि इतर गोड पेये पिणे कमी करा. यामध्ये भरपूर साखर असते. त्याऐवजी साधे पाणी प्या.
वजन कमी करताना आहारात प्रोटीन असणे गरजेचे आहे. यासाठी डाळी, पनीर, अंडी, दूध आणि दही खा. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.
आहारात फळे, पालेभाज्या, कडधान्ये आणि धान्यांचा समावेश करा. यामुळे पचन चांगले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
वजन कमी करण्यासाठी रोज चालणे, सायकलिंग किंवा इतर व्यायाम करा. यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास शरीराचे स्नायू मजबूत राहण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामाइतकीच झोपही महत्त्वाची आहे. रोज पुरेशी झोप घ्या. कमी झोपेमुळे भूक वाढू शकते आणि खाण्याच्या सवयी बदलू शकतात.
वजन लवकर कमी करण्यासाठी जेवण सोडू नका किंवा उपाशी राहू नका. वेळेवर जेवण करा आणि आहारात पोषक पदार्थांचा समावेश ठेवा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.