उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हा कारागृहात बंद असलेले भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष छोटेलाल पासवान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते 58 वर्षांचे होते. गुरुवारी बीआरडी मेडिकल कॉलेजच्या नेहरू रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छोटेलाल पासवान हे खोराबार गावचे रहिवासी होते. त्यांनी भाजपचे खोराबार मंडळ अध्यक्ष तसेच प्रधान संघाचे मंडळ अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. 2004 मध्ये दाखल झालेल्या हत्या करण्याचा प्रयत्न आणि दंगल घडवण्याच्या प्रकरणात न्यायालयाने 25 जुलै 2024 रोजी त्यांना आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.
दरम्यान 1 नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने कारागृह प्रशासनाने त्यांना बीआरडी मेडिकल कॉलेजच्या नेहरू रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचे कुटुंब देखील रुग्णालयात उपस्थित होते.
जेल अधीक्षक दिलीप पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटेलाल पासवान यांची जेलमध्ये येण्याआधीच प्रकृती खराब होती. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.