

मेरठमध्ये भाजप नेते राजीव गुप्ता यांच्या २६ वर्षीय मुलाचा मृत्यू
प्रवल गुप्ता यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू
मेरठमध्ये भाजप मंडल उपाध्यक्षाच्या मुलाच्या मृत्यूने खळबळ
उत्तर प्रदेशमधील भाजपच्या एका नेत्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मेरठ येथे कंकरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेलपुरी येथे ही घटना घडलीय. पटेलपुरी येथील रहिवासी आणि भाजपाचे मंडल उपाध्यक्ष राजीव गुप्ता यांचा २६ वर्षीय मुलगा प्रवल याने विषारी पदार्थाचं सेवन करून जीवनयात्रा संपवलीय.
पोलीस तपासात आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर आले आहे. भाजपच्या नेत्यानं पत्नीच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवल गुप्ता हा गाझियाबादमध्ये खासगी नोकरी करत होता. वर्षभरापूर्वीच प्रवलाचा विवाह झाला होता. प्रवल हा पत्नी स्नेहा आणि तिच्या माहेरच्या नातेवाईकांकडून सातत्याने होणारा मानसिक क्षळ आणि धमक्यांमुळे त्रस्त होता. दरम्यान प्रवल कँट परिसरात बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारांदरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
प्रवलनं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ शूट केला होता, त्यात त्याने स्नेहा गुप्ता त्याच्या माहेरच्या नातेवाईकांकडून त्रास होत असल्याचं म्हटलं होतं .माझी पत्नी माझ्या आईला मारहाण करायची. बहिणीशी गैरवर्तन करून तिची पूर्ण मालमत्ता आपल्या नावावर करणार होती. इतकेच नाही तर ३१ ऑक्टोबर रोजी पोलीस लाईनमधील कौटुंबिक समुपदेशन केंद्रामध्ये समुपदेशनादरम्यान पत्नीने माझ्यावर खोटे आणि गंभीर आरोप केले, असा आरोप प्रवलने या व्हिडिओमध्ये केला केला.
मुलाच्या मृत्यूनंतर भाजपा नेते राजीव गुप्ता यांची प्रकृती बिघडलीय. गतवर्षी आजच्याच दिवशी मी मुलाची वरात घेऊन गेलो होता. आज वर्षभरानंतर त्याची दुसरी वरात घेऊन जातोय, असं त्यांनी शोकाकुल होऊन सांगितले. तर प्रवलची आई किरण गुप्ता यांनी आरोप केला की, त्यांची पत्नी घरात कुठलंही काम करत नसे. तासनतास फोनवर बोलत राहायची. वेगळं राहण्यासाठी दबाव आणायची.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.