Bus Hijack In America Video 
देश विदेश

Bus Hijack video: चालकाच्या डोक्यावर बंदूक लावत बस केली हायजॅक; पोलिसांनी ३० किमीपर्यंत केला गुन्हेगाराचा सिनेस्टाईल पाठलाग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुम्ही आजवर विमान हायजॅक केल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण अमेरिकेत एका व्यक्तीने बस हायजॅक करून पळवून नेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एका व्यक्तीने अमेरिकेच्या रस्त्यावरून जाणाऱ्या बसला हायजॅक केले. हायजॅक झालेल्या बसमध्ये एकूण १७ प्रवासी होते. याची पोलिसांना माहिती मिळताच सर्वत्र खळबळ उडाली.

या गुन्हेगाराने अमेरिकन पोलिसांना सुमारे ३० किमीपर्यंत पळवले. तासाभराच्या प्रयत्नानंतर पोलिसांना त्या गुन्हेगाराला पकडण्यास यश आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत. नेटकरी म्हणतात की, हा गुन्हेगार भारतात असता तर 3 मिनिटांत पकडला गेला असता. कारण भारतात ट्राफिक एवढं असत की पळून जाणे अशक्य आहे.

ही घटना अमेरिकेतील अटलांटा शहरात घडली आहे. अटलांटा पोलीस प्रमुख डारिन शियरबाम यांनी सांगितले की, आम्ही डाउनटाउन मॉलच्या फूड कोर्टमध्ये झालेल्या गोळीबाराची माहिती घेत असताना पोलीस हेल्पलाइन ९११ वर कॉल आला. एका गुन्हेगाराने हातात बंदूक घेऊन प्रवाशांनी भरलेल्या बसचे अपहरण केल्याचे त्या कॉलवर सांगण्यात आले. पोलिसांनी बस थांबविण्याचा प्रयत्न केला असता अपहरणकर्त्याने बसवर गोळीबार केला.

या गुन्हेगाराने ड्रायव्हरच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्याला ब्रेक लावू दिला नाही. पोलिसांनी समोरून बस थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या गाडीला सुद्धा धडक देत त्यांनी बस पुढे नेली. पुढे रस्ता क्रॉस करताना त्यांनी आणखीन दोन वाहनांना देखील धडक दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा चोर आणि पोलिसांचा हा खेळ तासभर अमेरिकेच्या रस्त्यावर सुरु होता. सुमारे ३० किलोमीटर पाठलाग केल्यानंतर पोलिसांना गुन्हेगाराला पकडण्यात यश आले.

पोलिसांनी या बस प्रकरणातील ३९ वर्षीय गुन्हेगाराला अटक केली. अटलांटाचे महापौर आंद्रे डिकेन्स यांनी सांगितले की, या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून बाकी प्रवाशांचा जीव वाचला आहे. कारण या गुन्हेगाराने ड्रायव्हरला धमकी दिली होती की, जर बस थांबवण्यात आली तर याचे परिणाम वाईट होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT