तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी
एक विमान ज्यानं टेक ऑफ केलं पण ते लँड झालं 30 वर्षांनंतर अशा आशयाचा मेसेज सध्या व्हायरल झालायं. विमान कसं गायब होऊ शकतं काय नेमकं घडलं...त्यामागचं सत्य काय जाणून घेऊ.
जगात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात जलद पर्याय म्हणून विमानसेवेचा वापर केला जातो. आता कल्पना करा तुम्ही तुमच्या ड्रिम डेस्टिनेशनला जाण्यासाठी विमानप्रवास करताय. तुम्ही चेक इन केलंत. तुमचं सामानंही चेक झालं. आता तुम्ही विमानात बसलात. विमानानं टेकऑफ केलं. आणि हे विमान गायब झालं.
होय ते विमान आहे फ्लाइट 914, जे अमेरिकेतून उड्डाण करतं आणि 30 वर्षांनंतर लँड होतं आणि पुन्हा गायब होतं. ही घटना घडली ती फ्लाईट 914 सोबत. फ्लाइट 914 नं 2 जुलै 1955 रोजी न्यूयॉर्क, यूएसए इथून मायामीसाठी उड्डाण केलं. या विमानात एकूण 57 प्रवासी होते, त्यासोबत 6 क्रू मेंबर देखील होते.त्या काळात अमेरिकेने या विमानाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. सध्या न्यूयॉर्कहून मायामीला विमानाने जाण्यास साडेतीन तास लागतात. 1955 मध्ये, न्यूयॉर्क ते मायामी उड्डाण करण्यासाठी जास्तीत जास्त पाच तास लागत होते.
1955 मध्ये बेपत्ता झालेले विमान ‘फ्लाइट 914’ 30 वर्षांनंतर 9 मार्च 1985 रोजी व्हेनेझुएलामधील कराकस विमानतळावर रहस्यमयरित्या लँड झालं. तेव्हा अवघं जग थक्क झालं. यावेळी वैमानिकानं ग्राऊंड स्टाफला विचारलं हे कोणतं वर्ष आहे? त्यावर ग्राउंड स्टाफनं सांगितले की हे वर्ष 1985 आहे. हे ऐकून पायलटनं दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला अरे देवा. यानंतर कोणालाही काही समजण्यापूर्वीच विमानानं पुन्हा आकाशात उड्डाण केलं.
न्यूज एजन्सी एएफपीच्या रिपोर्टनुसार, फ्लाइट बेपत्ता झाल्याचा दावा खोटा आहे. असे कोणतेही प्रकरण समोर आले नव्हते. खरं तर, ही माहिती पहिल्यांदा 1985 मध्ये अमेरिकन प्रिंट टॅब्लॉइड, साप्ताहिक वर्ल्ड न्यूजमध्ये प्रकाशित झाली होती. या पेपरमध्ये अनेक काल्पनिक कथा प्रसिद्ध झाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.