Kuwait Fire : कुवेतमध्ये आग लागलेल्या इमारतीचे मालक प्रसिद्ध भारतीय व्यापारी; 40 भारतीयांचा झालाय होरपळून मृत्यू

KG Abraham/ NBTC Group : कुवेतमध्ये लागलेल्या आगीत ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागलेली इमारत मल्याळम व्यापारी केजी अब्राहम यांच्या मालकीच्या NBTC समूहाची आहे.
Kuwait Fire
Kuwait FireSaam Digital
Published On

कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ५१ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 40 भारतीयांचाही समावेश आहे. तामिळनाडू, केरळ आणि उत्तर भारतातील कामगार राहात असलेल्या या इमारतीचे मालकही भारतीय आहेत. मल्याळम व्यापारी केजी अब्राहम यांच्या मालकीच्या NBTC समूहाची ही इमारत असून एनबीटीसी सुपरमार्केटचे कर्मचारीही या इमारतीत राहात होते. टीव्ही ९ ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

कुवेतमधील सर्वात मोठा बांधकाम समूह NBT चे KG अब्राहम भागीदार आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. केरळमधील कोची येथील क्राउन प्लाझाचे अध्यक्ष आहेत. हे 5 स्टार हॉटेल आहे. त्यांनी केरळमधील इतर अनेक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. सध्या केरळमध्ये त्यांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. केजी अब्राहम हे केरळमधील तिरुवल्ला येथील प्रसिद्ध व्यापारी असून त्यांना 'केजीए' म्हणूनही ओळखलं जातं. केजीए ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. 1977 पासून ते कुवेतमधील तेल आणि संबंधित उद्योगांशी जोडले गेले आहेत.

Kuwait Fire
Fire in Kuwait: कुवेतमधील कामगारांच्या इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीयांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com