Fire in Kuwait: कुवेतमधील कामगारांच्या इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीयांचा मृत्यू

Fire Broke Out at Building in Kuwait: कुवेतमधील कामगारांच्या एका इमारतीत बुधवारी लागलेल्या भीषण आगीत ४० भारतीयांचा मृत्यू झाल्याचं वृत्त हाती आले आहे. दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात बुधवारी पहाटे ६ मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात आग लागली होती.
Fire in Kuwait: कुवेतमधील कामगारांच्या इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीयांचा मृत्यू
Fire in Kuwaitx
Published On

कुवेतमधून एक मोठी बातमी समोर आलीय. येथील दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात असलेल्या एका सहा मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या इमारतीत सर्व रहिवाशी एकाच कंपनीमधील कर्मचारी आहेत. बुधवारी सकाळी कामगारांच्या इमारतीच्या स्वयंपाकघरात आधी आग लागली नंतर या आगीने इमारतीला विळखा घातला.

आग जेव्हा लागली त्यावेळी इमारतीमधील सर्व कामगार झोपलेले होते. दरम्यान दुबईचे गृहमंत्री शेख फहाद अल-युसूफ अल-सबाह यांनी या घटनेची पुष्टी केलीय. घटनास्थळाच्या भेटीदरम्यान इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिलेत, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीमध्ये राहत असलेल्या कामगारांमध्ये सर्वाधिक जण भारतीय होते. या भीषण आगीत होरपळून ४० भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर ३० हुन अधिकजण जखमी झालेत, त्यांना अल-अदान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान कुवेतमधील भारतीय राजदूत आदर्श स्वैका यांनी अल-अदान हॉस्पिटलला भेट दिलीय.

या इमारतीत जवळपास १६० लोक राहत होते. यातील बरेच कामगार भारतीय होते. हाती आलेल्या माहितीनुसार, या आगीत होरपळून ४१ जणांचा मृत्यू झालाय.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनीही याची माहिती दिलीय. आगीत ४१ जणांच्या मृत्यूवर जयशंकर यांनी दु: ख व्यक्त केलंय. जयशंकर यांनी आपल्या एक्सवर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. ४० हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि ५० हून अधिक जण जखमी झाले असून ते रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान आगीत मृत पावलेल्या लोकांमध्ये बहुतांश भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे.

Fire in Kuwait: कुवेतमधील कामगारांच्या इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीयांचा मृत्यू
Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेनवर ओढवलं संकट? बेकायदेशीरीत्या बंदूक खरेदी प्रकरणात मुलगा हंटर दोषी

दरम्यान भारतीय राजदूतांनी आग लागलेल्या कॅम्पला भेट दिली. या घटनेप्रकरणी माहिती देताना जयशंकर म्हणाले, 'आम्ही पुढील माहितीची वाट पाहतोय. ज्यांनी दुःखदपणे आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना. जखमी झालेले व्यक्ती लवकर आणि पूर्ण बरे व्हावेत. याबाबत आमचा दूतावास सर्व संबंधित लोकांना पूर्ण मदत करेल.

कुवेतमध्ये भारतीय राजदुतांनी एक्सवर आपातकालीन हेल्पलाइन नंबर दिलाय +९६५-६५५०-५२४६ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करुन या घटनेप्रकरणी माहिती मिळवता येईल. दूतावासानेही शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे. कुवेतच्या एकूण लोकसंख्येपैकी २१ टक्के (१ दशलक्ष) भारतीय आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com