S. Jaishankar: लोकसभा निवडणुकीत विदेशी संस्थांचा हस्तक्षेप, परराष्ट्र मंत्री स्पष्टच बोलले; 'वॉर रुकवा दी पापा'वरील टीकेलाही कडक उत्तर

National News In Marathi: भारतातील लोकसभा निवडणुकीत परकीय शक्तींचा,आंतरराष्ट्रीय संस्थांचा हस्तक्षेप होत आहे, असं देशाचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर म्हणाले आहेत. मुंबईतील विविध माध्यमांच्या वरिष्ठ संपादकांशी चर्चा करताना ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत विदेशी संस्थांचा हस्तक्षेप, परराष्ट्र मंत्री स्पष्टच बोलले; 'वॉर रुकवा दी पापा'वरील टीकेलाही कडक उत्तर
S. JaishankarSaam Tv

Lok Sabha Election 2024:

भारतातील लोकसभा निवडणुकीत परकीय शक्तींचा,आंतरराष्ट्रीय संस्थांचा हस्तक्षेप होत आहे, असं देशाचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर म्हणाले आहेत. मुंबईतील (Mumbai) विविध माध्यमांच्या वरिष्ठ संपादकांशी चर्चा करताना ते बोलत होते.

वरिष्ठ संपादकांशी चर्चा करताना ते म्हणाले आहेत की, ''या निवडणुकीत डिजीटल मिडीयाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय संस्था मोदी विरोधी प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत.या आधीच्या निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीनं विरोधी विचारधारेचा प्रचार करण्यात आला होता. मात्र यंदाच्या निवडणुकांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे.काही देशांच्या विशिष्ट विचारधारेच्या मानसिकतेमुळे अशा पद्धतीचा प्रचार करण्यात येत आहे.पण मला वाटत नाही, ते त्यांच्या या प्रयत्नात यशस्वी होतील.''

लोकसभा निवडणुकीत विदेशी संस्थांचा हस्तक्षेप, परराष्ट्र मंत्री स्पष्टच बोलले; 'वॉर रुकवा दी पापा'वरील टीकेलाही कडक उत्तर
Amit Shah: कलम ३७० ते रामलला दर्शन; अमित शहांनी राहुल गांधींना विचारले ५ प्रश्न

'वॉर तो रुकवा दी पापा' याबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांबाबत प्रश्न विचारला असता भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) म्हणाले की, कीव्ह शहरातील भारतीय विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांनी तातडीने शहर सोडावं, असा आदेश आम्ही दिला होता. कमीतकमी कालावधीत जास्तीत जास्त भारतीयांची युक्रेनमधून सुटका करण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' ही मोहीम राबवण्यात आली. त्याचवेळी रशियानं किव्हवर गोळीबार सुरु केला. तेव्हा पंतप्रधान मोदींनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संपर्क साधला आणि रशियाला गोळीबार थांबवण्यास सांगितले, त्यानंतर लगेचच गोळीबार थांबवल्यानं भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यात यश आल्याचं जयशंकर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत विदेशी संस्थांचा हस्तक्षेप, परराष्ट्र मंत्री स्पष्टच बोलले; 'वॉर रुकवा दी पापा'वरील टीकेलाही कडक उत्तर
Hemant Soren: हेमंत सोरेन यांना मोठा धक्का; अंतरिम जामीन नामंजूर, पुढील सुनावणी केव्हा?

भारतातील निवडणुका, युरोपीय देशांसोबत असलेले भारताचे संबंध, पीओके अशा विविध विषयांवर यावेळी एस.जयशंकर यांनी देशाच्या आगामी काळातील भूमिकेवर भाष्य केले. दरम्यान, नाम चळवळीचं जागतिक स्थान हे कमकुवत झालं असून नॉन अलायनमेंट मुव्हमेंट प्रभावहीन झाली आहे. असं असलं तरीही भारत या चळवळीत आपलं स्थान राखून आहे असं सांगताना येत्या पाच वर्षात जागतिक राजकारणात आणि सामरिक स्थितीत मोठी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यताही जयशंकर यांनी बोलून दाखवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com