Swargandharv Sudhir Phadke: मराठी चित्रपटांना परदेशात पसंती;'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचे अमेरिकेतील शो हाऊसफुल

Swargandharv Sudhir Phadke Show Housefull: गायक, संगीतकार, लेखक अशा सर्व कलांमध्ये पारंगत असणारे सुधीर फडके यांची गाणी ऐकत आपण सर्वजण मोठे झाले आहोत. सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
Swargandharv Sudhir Phadke Show Housefull
Swargandharv Sudhir Phadke Show HousefullSaam Tv

गायक, संगीतकार, लेखक अशा सर्व कलांमध्ये पारंगत असणारे सुधीर फडके यांची गाणी ऐकत आपण सर्वजण मोठे झाले आहोत. सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला संपूर्ण जगभरात पसंती मिळत आहे. चित्रपट फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेतील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. चित्रपटाचे अमेरिकेतील शो हाऊसफुल झाले आहेत.

स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. अमेरिकेत या चित्रपटाचे १०० शोज 'हाऊसफुल' होत आहेत. त्यामुळे चित्रपट जागतिक पातळीवर प्रेक्षकांनी प्रचंड आवडणार असल्याचे म्हटले आहे. चित्रपट भारतासह दुबई, लंडन आणि जर्मनीमध्येही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे अमेरिकेतील शो हाऊसफुल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी माहिती दिली आहे. '' परदेशात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही शोज हाऊसफुल्ल झाले होते. महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच परदेशातील प्रेक्षकही इतके प्रेम या चित्रपटावर करत आहेत, हे भारावणारे आहे. बाबूजी हे नावच इतके मोठे आहे की, त्यांचे जगभरात चाहते आहे. आजही त्यांची गाणी अजरामर आहेत. तरुणाईही त्यांची गाणी तितक्याच आत्मीयतेने ऐकते. सगळ्याच कलाकारांचे कौतुक होत आहे. एका टीमला यापेक्षा जास्त काय हवे. मी सगळ्याच प्रेक्षकांचा मनापासून आभारी आहे", असे त्यांनी सांगितले.

Swargandharv Sudhir Phadke Show Housefull
Salman Khan Firing case Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; भाईजानआधी २ अभिनेते होते निशाण्यावर, घरांची केली होती रेकी

सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे हे कलाकार प्रमुख भूमिकेतआहेत. चित्रपटात सुनील बर्वे यांनी सुधीर फडके यांची भूमिका साकारली आहे. तर मृण्मयीने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

Swargandharv Sudhir Phadke Show Housefull
Tu Bhetashi Navyane: 'तू भेटशी नव्याने' मालिकेतून सुबोध भावे- शिवानी सोनार ही जोडी पहिल्यांदाच एकत्र; मालिकेचा प्रोमो आऊट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com