Budget 2024 Saam Digital
देश विदेश

Budget 2024: निर्मला सीतारामन मोडणार मोरारजी देसाईंचा विक्रम? असा विक्रम करणाऱ्या पहिल्याच महिला अर्थमंत्री

Budget 2024 News: सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन देशाच्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. आतापर्यंत हा विक्रम केवळ माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे.

Sandeep Gawade

Budget 2024

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्प नसेल कारण २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणूकपूर्व खर्च भागवण्यासाठी सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. दरम्यान सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. आतापर्यंत हा विक्रम केवळ माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे.

निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना, त्या मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांसारख्या माजी अर्थमंत्र्यांच्या रेकॉर्डला मागे टाकतील. या नेत्यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर केले होते. अर्थमंत्री म्हणून, देसाई यांनी 1959-1964 दरम्यान पाच वार्षिक आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या आर्थिक वर्ष 2024-25 साठी अंतरिम अर्थसंकल्पावर मतदान केले जाईल. यामुळे एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर नवीन सरकार येईपर्यंत काही वस्तूंवर खर्च करण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही मोठे धोरणात्मक बदल होण्याची शक्यता नाही. अर्थमंत्र्यांनी गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात अंतरिम अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा करण्यास नकार दिला होता. सार्वत्रिक निवडणुकीनंतर जूनच्या आसपास नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नवीन सरकार 2024-25 साठीचा संपूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये आणणार आहे.

तसं पाहिलं तर अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या धोरणात्मक घोषणा नसतात, परंतु अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यास सरकारवर कोणताही प्रतिबंध नाही. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर, अरुण जेटली यांनी अर्थ मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आणि 2014-15 ते 2018-19 पर्यंत सलग पाच अर्थसंकल्प सादर केलेल होते. 2017 मध्ये, सरकारने फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसाऐवजी एका तारखेला अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याची वसाहतकालीन परंपरा संपुष्टात आली. त्यानंतर जेटलींची प्रकृती खालावल्यामुळे मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पीयूष गोयल यांनी 1 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

Maharashtra Live News Update: चिंचवडमध्ये मॉलजवळ मोठी आग

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

SCROLL FOR NEXT