Pakistan Blame On India: कॅनडाप्रमाणेच पाकिस्ताननेही भारतावर केले गंभीर आरोप, अमेरिकेने दिली प्रतिक्रिया

Pakistan Blame On India: कॅनडा आणि अमेरिकेनंतर पाकिस्ताननेही भारतावर गंभीर आरोप केले आहेत. बुधवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावर पाकिस्तानी नागरिकांची हत्या केल्याचा आरोप केला.
Pakistan Blame On India
Pakistan Blame On IndiaSaam Digital
Published On

Pakistan Blame On India

कॅनडा आणि अमेरिकेनंतर पाकिस्ताननेही भारतावर गंभीर आरोप केले आहेत. बुधवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावर पाकिस्तानी नागरिकांची हत्या केल्याचा आरोप केला. दोन पाकिस्तानी नागरिकांच्या हत्येप्रकरणी या प्रकरणातील आरोपी आणि भारतीय एजंट यांच्यातील संबंध असल्याचे भक्कम पुरावे मिळाले असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या या आरोपावर अमेरिकेनेही प्रतिक्रिया दिली आहे.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपमुख्य प्रवक्ते वेदांत पटेल यांना यासंदर्भात विचारण्यात आलं होतं. मात्र त्यांनी "माझ्याकडे या प्रकरणाबाबत कोणतीही विशेष माहिती नाही. अशा परिस्थितीत मी पाकिस्तान आणि भारत सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करण्यावर भर देईन, असं म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव मुहम्मद सायरस सज्जाद काझी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत, भारतीय एजंटांनी पाकिस्तानी नागरिक शाहिद लतीफची पाकिस्तानी भूमीवर हत्या केल्याचा आरोप केला होता. रावला कोट मशिदीत मोहम्मद रियाझ या आणखी एका पाकिस्तानी नागरिकाला ठार मारण्यासाठी भारतीय एजंटांनी मारेकरी भाड्याने घेतले होते. त्याचे ठोस पुरावे आपल्याकडे असल्याचं म्हटलं होतं.

Pakistan Blame On India
Tourist Country: पर्यटकांनी पाठ फिरवली तर मालदीवसह 'या' देशाच्या अर्थव्यवस्थेला लागेल ब्रेक

पाकिस्तानच्या आरोपांना उत्तर देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, आम्ही भारताच्या संदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांचे काही मीडिया रिपोर्ट्स पाहिले. भारताविरुद्ध खोटे बोलणे आणि अपप्रचार करण्याची ही पाकिस्तानची खेळी आहे. पाकिस्तान नेहमीच दहशतवाद, संघटीत गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कारवायांचे केंद्र राहिले आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. भारत आणि इतर अनेक देशांनी पाकिस्तानला जाहीरपणे इशारा दिला आहे की तो दहशतवाद आणि हिंसाचाराच्या स्वतःच्या प्रचाराचा बळी ठरेल. पाकिस्तानने जे पेरले तेच उगेल. स्वतःच्या कृत्यासाठी इतरांना दोष देऊन काही उपाय होणार नसल्याचं म्हणत पाकिस्तानला सुनावलं आहे.

Pakistan Blame On India
Gyanvapi ASI Survey : ज्ञानवापी मशीद की मंदिर? काय आहेत ASIअहवालातील १० महत्त्वाचे पुरावे?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com