Tourist Country: पर्यटकांनी पाठ फिरवली तर मालदीवसह 'या' देशाच्या अर्थव्यवस्थेला लागेल ब्रेक

Tourist Country News: मालदीवची बहुतांश अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली तेव्हापासून मालदीवचे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
Tourist Country
Tourist CountrySaam Digital
Published On

Tourist Country

मालदीवची बहुतांश अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली तेव्हापासून मालदीवचे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ४४ हजार कुटुंबांवर कुटुंबांवर याचा परिणाम होत आहे. दरम्यान आज आपण अशाच पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या देशांविषयी जाणून घेणार आहोत.

मालदीव हा आपला शेजारी आणि हिंदी महासागरात वसलेला एक छोटासा देश आहे. 2022 मध्य या देशाच्या जीडीपीच्या 68 टक्के वाटा विदेशी पर्यटकांचा होता. हा देश लहान असला तरी त्याचे दरडोई उत्पन्न 36,400 डॉलर आहे, ज्यामुळे तो एक श्रीमंत देश आहे.

अँटिग्वा आणि बरबुडाची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अबलंबून आहे. या देशाच्या एकूण जीडीपीच्या 55 टक्के हिस्सा हा पर्यटानाचा असून यात विदेशी पर्यटकांचा वाटा अधिक आहे. येथे प्रत्येक पर्यटक सरासरी 3500 डॉलर खर्च करतो. या देशाचा जीडीपी १.७ अब्ज डॉलर असून दरडोई उत्पन्न 31000 डॉलर आहे. या यादीतील सेशेल्स हा तिसरा देश आहे जो आपल्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटकांवर अवलंबून आहे. 1.9 अब्ज डॉलरचा GDP असलेला सेशेल्सने 2022 मध्ये आपल्या GDP च्या 23 टक्के उत्पन्न विदेशी पर्यटकांच्या माध्यमातून आले होते. हा एक श्रीमंत देश असून ज्याचं सरासरी दरडोई उत्पन्न 40,000 डॉलर आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tourist Country
Maratha, OBC Reservation: मराठा समाज आल्यावर ओबीसींचं संपूर्ण आरक्षणच फस्त करतील, ओबीसी नेते आक्रमक

जमैका हे प्रसिद्ध ॲथलीट हुसेन बोल्टसाठीही ओळखले जाते. 16 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेला हा देश 2022 मध्ये एकून उत्पन्नाच्या 23 टक्के उत्पन्न मिळालं आहे. हा एक गरीब देश आहे ज्याचं सरासरी दरडोई उत्पन्न 12,000 डॉलर आहे. क्रोएशिया हा GDP च्या बाबतीत या सर्व देशांपैकी तुलनेने मोठा देश आहे. त्याची जीडीपी 71 अब्ज डॉलर्स आहे. 2022 मध्ये विदेशी पर्यटनाच्या माध्यमातून 15.3 टक्के उत्पन्न मिळालं होतं. या देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न 42,500 डॉलर आहे.

Tourist Country
Maharashtra Politics: ठाकरे गटाने फुंकले रणशिंग! लोकसभेच्या तोंडावर ८०० किलोमीटरची यात्रा, 'मातृतीर्थ ते शिवतीर्थ' अभियानाची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com