Maratha, OBC Reservation: मराठा समाज आल्यावर ओबीसींचं संपूर्ण आरक्षणच फस्त करतील, ओबीसी नेते आक्रमक

Maratha, OBC Reservation: मराठा समाजाला सगे - सोयाऱ्याच्या कुणबीच्या दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदीप्रमाणे जातीचे दाखले दिल्यास ,ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय होईल, असा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.
Maratha, OBC Reservation
Maratha, OBC ReservationSaam Digital
Published On

Maratha, OBC Reservation

मराठा समाजाला सगे - सोयाऱ्याच्या कुणबीच्या दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदीप्रमाणे जातीचे दाखले दिल्यास ,ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय होईल, असा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. बारा बलुतेदारांच्या ताटातील ओबीसी आरक्षण दिवसा-ढवळ्या ओढुन नेण्याचा हा प्रकार आहे. की ,ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देऊ, असं मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते मात्र आता त्यांची भूमिका उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या १९ टक्के आरक्षणामध्ये करोडच्या संख्येने मराठा समाज आल्यावर ओबीसींचे संपूर्ण आरक्षणच ते फस्त करतील. यासाठीच आम्ही सांगत होतो की, मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचे उप -वर्गीकरण करून आरक्षण द्यावे. या सर्व प्रकरणास जितके सरकार जबाबदार आहे, तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत, आम्ही सरकारचे तसेच ओबीसी नेत्यांचा धिक्कार करतो असा घणाघात करून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शासानासह ओबीसी नेत्यांचा निषेध व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha, OBC Reservation
Maharashtra Politics: ठाकरे गटाने फुंकले रणशिंग! लोकसभेच्या तोंडावर ८०० किलोमीटरची यात्रा, 'मातृतीर्थ ते शिवतीर्थ' अभियानाची घोषणा

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. लाखो मराठा बांधवांसह राजधानी मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईतील आझाद मैदानात जाण्यावर ठाम होते. मात्र त्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत आता जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये जाहीर सभा घेतली. सरकारसोबत आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे शिष्टमंडळ तसेच वकिलांसोबतही चर्चा केली. या चर्चेनंतर वाशीच्या छत्रपती शिवाजी नगर चौकात सभा घेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरील सरकारने काढलेला जीआर वाचून दाखवला.

Maratha, OBC Reservation
Maratha Protest Mumbai: CSMT समोर मराठा आंदोलकांकडून चक्काजाम; आझाद मैदानाकडे जाणारा मार्ग रोखला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com