Operation Sindoor (16) Saam
देश विदेश

Jammu Border: LOC वर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, जवानांनी ७ दहशतवाद्यांचा खात्मा कसा केला? पाहा VIDEO

Jammus Samba Sector Viral Video: देशातील विविध ठिकाणी दहशतवादी घुसखोरीचे प्रयत्न वाढले असताना, गुरुवारी मध्यरात्री जम्मूच्या सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Bhagyashree Kamble

भारत आणि पाकिस्तानदरम्यान सध्या तणावाची परिस्थिती आहे. बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताच्या विविध भागांमध्ये ड्रोन हल्ल्यांचे सत्र सुरू आहे, मात्र भारत देखील या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. देशातील विविध ठिकाणी दहशतवादी घुसखोरीचे प्रयत्न वाढले असताना, गुरुवारी मध्यरात्री जम्मूच्या सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला.

पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गटाने भारतात शिरकाव करण्याचा डाव आखला होता, मात्र सीमा सुरक्षा दल (BSF) जवानांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आणि ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला. याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

जम्मूच्या सांबा सेक्टरमधील आतंरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पाकड्यांचा हा प्रयत्न सीमा सुरक्षा दल (BSF)च्या जवानांनी हाणून पाडला.

आतंरराष्ट्रीय सीमेजवळ काही संशयास्पद हालचाली बीएसएफच्या जवानांना आढळल्या. जवानांनी तातडीने कारवाईला सुरूवात केली. या कारवाईदरम्यान, दोन्ही बाजूने बेछूट गोळीबार झाली. काहींनी यावेळेस माघार घेतली. या कारवाई दरम्यान, ७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बीएसएफच्या जवानांनी सांबा जिल्ह्यातील आतंरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला आहे. त्यांनी केलेल्या कारवाईत किमान ७ दहशतवाद्यांना ठार मारले, तर पाकिस्तानी चौकीचे मोठे नुकसान केले आहे. याची अधिकृत माहिती बीएसएफने दिली आहे. सध्या या घुसखोरांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ समोर आला असून, हा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT