नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत बहुमत मिळवले. तेलंगणाच्या निर्मितीपासून सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या वर्चस्वाला कॉंग्रेसने जोरदार धक्का दिला.
तेलंगणामधील विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. अखेर कॉंग्रेसच्या विजयाचे शिल्पकार रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
नुकत्याच तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे (Telangana Assembly Election) निकाल समोर आले. निवडणुकीत कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला. कॉंग्रेसच्या या ऐतिहासिक विजयात निर्णायक भूमिका होती ती प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांची. काँग्रेसने (Congress) 2021 रेवंत यांना मोठी जबाबदारी देत त्यांची तेलंगणा राज्य युनिटचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती.
त्यामुळेच तेलंगणामधील विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी रेवंथ रेड्डी (CM Revanth Reddy) यांचे नाव आघाडीवर होते. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सात डिसेंबरला त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रेवंथ रेड्डी यांची राजकीय कारकिर्द...
सध्या रेवंत रेड्डी यांच्याकडे तेलंगणा प्रदेश काँग्रेस युनिटचे अध्यक्षपद आहे. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1967 रोजी अविभाजित आंध्र प्रदेशातील कोंडारेड्डी पल्ली, नगरकुर्नूल येथे झाला. या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या विरोधात निवडणूक लढवली. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.