दिल्ली, ता. १९ जुलै २०२४
मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील बँकिंग सेवा आणि विमान सेवेला मोठा फटका बसला आहे. जगभरातील विंडोज युजर्सना त्यांच्या डिव्हाईसवर इरर मेसेज येत असून या बिघाडामुळे बँकिंग कामकाज, शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. तसेच जगभरातील विमानसेवाही विस्कळीत झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील विमानसेवा, बँका तसेच शेअर मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे. जगभरातील मायक्रोसॉफ्ट युजर्सना इररचा मेसेज येत असून तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत आहे. यामुळे ऑनलाईन बुकिंग, चेक-इन आणि इतर सेवांवर परिणाम होत आहे.
या सर्व्हर डाऊनचा दिल्ली आणि मुंबई सह देशातील सहा विमानतळांना फटका बसला आहे. या संदर्भात सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. प्रवाशांनी वेळेपूर्वी दोन तास विमानतळावर येण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जगभरातील जवळपास २ हजारे उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. यासंदर्भात कंपनीकडूनही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही यावर काम करत असून निराकरण करण्यासाठी अनेक टीम बोलावल्या आहेत. आम्हाला बिघाडही सापडला आहे, असं मायक्रोसॉफ्ट कंपनीने म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.