Indian Coast Guard Helicopter Crash:  Saamtv
देश विदेश

Helicopter Crash: इमर्जन्सी लँडिगवेळी मोठी दुर्घटना! बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले; ३ जण बेपत्ता

Indian Coast Guard Helicopter Crash: या हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे फारसे नुकसान झाले नसले तरी, हेलिकॉप्टरमधील 4 क्रू सदस्यांपैकी 3 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

Indian Navy Helicopter Emergency Landing: गुजरातमधून एक मोठी दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. गुजरातमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात येणार होते, यावेळी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे फारसे नुकसान झाले नसले तरी, हेलिकॉप्टरमधील 4 क्रू सदस्यांपैकी 3 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे.

बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळले

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरातमध्ये सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे. भारतीय तटरक्षक दलाचेही एक हेलिकॉप्टर गुजरातमध्ये पूर मदत कार्यात गुंतले होते, परंतु काल रात्री पोरबंदर किनाऱ्यापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राजवळ हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटला हेलिकॉप्टर पाण्यात उतरवावे लागले. लँडिंगच्या वेळी जोरात ते पाण्यात पडले, त्यामुळे हेलिकॉप्टरमधील चारही जण बुडाले.

३ जण बेपत्ता

या हेलिकॉप्टरमध्ये एकूण चार जण होते ज्यामधील एक जण सुखरुप असून तीन जण बेपत्ता झाले आहेत. वैमानिकाने आपत्कालीन संदेश पाठवला असल्याने त्यांच्या मदतीसाठी नौदलाची चार जहाजे आणि दोन विमाने तैनात करण्यात आली आहेत. या अपघाताची माहिती नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून त्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्यात येत आहे. हेलिकॉप्टर मोटार टँकर हरी लीलावर उतरणार होते, पण त्याचा अपघात झाला.

गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ!

गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे राज्यातील परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे गुजरातमधील पोरबंदर आणि द्वारका जिल्ह्यांतील अनेक भागात बचावकार्य सुरू आहे. ICG, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि NDRF व्यतिरिक्त, भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने देखील पूरग्रस्त भागातून संघर्ष करणाऱ्या लोकांना बाहेर काढले आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवले आहे. दरम्यान, काल राजस्थानच्या बाडमेरमध्ये हवाई दलाचे मिग २९ लढाऊ विमान कोसळले होते. विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित असले तरी अपघातानंतर विमान जळून राख झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT