Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीवर संकट? केंद्रीय मंत्री नाराज, पुढील काही दिवसांत काय निर्णय घेणार?

Ramdas Athawale News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीवर मोठं संकट उभं राहिलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आठवले निवडवणुकीच्या तोंडावर काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.
Mahayuti Seat Sharing
MahayutiSaam Tv
Published On

सुशील थोरात, साम टीव्ही प्रतिनिधी

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे महायुतीवर नाराज असल्याचं दिसून आले आहे. अहमदनगरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. अहमदनगरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं भाष्य केलं. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला दहा ते बारा जागा मिळाव्यात. त्याचबरोबर त्यांनी महायुतीच्या नेत्यांना अशी विनंती केली की रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Mahayuti Seat Sharing
Mahayuti Dispute : विधानसभेआधीच महायुती फुटणार? रायगडात पुन्हा उडाली वादाची ठिणगी, VIDEO

'अनेक कार्यकर्ते माझ्याकडे तक्रार करत आहेत की शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलले जात होते. तर सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या लाडकी बहीण कार्यक्रमाला कार्यकर्त्यांना बोलावलं जात नाही, त्यानंतर सत्तेमध्ये कुठलाही सहभाग दिला जात नाही. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एक तरी मंत्री आमचा आरपीआयचा असायला हवा होता. मात्र एकही मंत्री घेण्यात आला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराच्या वेळी आपला मंत्री घेऊ, असं सांगितलं. मात्र आता दोन अडीच वर्षे होत आले आहे. आता तरी मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा अपमान होणे हे योग्य नाही, रिपब्लिकन जनता ही अभिमान बाळगणारी जनता आहे, असेही रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

Mahayuti Seat Sharing
Mahayuti Quarrel News : निधी वाटपावरून अजित पवार आणि गिरीश महाजनांत वाद?

जातनिहाय जनगणनेवर रामदास आठवले काय म्हणाले?

निवडणुकांच्या फायद्यासाठी जातनिहाय जनगणना करण्यास आरएसएसने विरोध दर्शवली आहे. तर सुप्रीम कोर्टाने देखील जातनिहाय जनगणनेचा आदेश देण्यास नकार दिला आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विचारले असता जातनिहाय जनगणना व्हायला हवी, असं आमच्या पक्षाचे मत आहे. उद्या जर अशी वेळ आली की, प्रत्येक जातीतील लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण दिलं जावं, तर आमचं आम्हाला द्या आणि तुमचं तुम्ही घ्या. आम्हाला तुमच्यात वाटा घेण्याची इच्छा नाही अशी आमची भूमिका असल्याचे रामदास आठवले म्हणाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com