Mayawati Latest News SAAM TV
देश विदेश

BSP chief Mayawati: ना INDIA ना NDA... बसपा प्रमुख मायावतींची मोठी घोषणा; आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा

BSP chief Mayawati: मायावती यांनी इंडिया आघाडी तसेच एनडीएसोबतही न जाता आगामी लोकसभा निवडणुका देशभरात स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.

Gangappa Pujari

BSP chief Mayawati Birthday:

बसपच्या प्रमुख मायावती यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त मायावती यांनी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकांबाबत सर्वात मोठी घोषणा केली आहे. मायावती यांनी इंडिया आघाडी तसेच एनडीएसोबतही न जाता आगामी लोकसभा निवडणुका देशभरात स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. आघाडी केल्याने बसपाला फायदा झाला नाही, असे म्हणत त्यांनी बसपा कोणत्याही युतीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बसपा प्रमुख मायावती (Mayavati) यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त लखनौमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना समाजवादी पक्षासोबतच भाजपवरही (BJP) निशाणा साधला. यावेळी त्यांनी ईव्हीएम आणि इंडिया आघाडीचा उल्लेख करत त्यांचा बसपा पक्ष संपूर्ण देशात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

युतीचा संदर्भ देत मायावती म्हणाल्या, 'युती केल्याने पक्षाला फायदा कमी तोटा जास्त होतो आणि आमची मतांची टक्केवारीही कमी होऊन इतर पक्षांना फायदा होतो. त्यामुळे बहुतांश पक्षांना बसपासोबत युती करून निवडणूक लढवायची आहे. आमचा पक्ष एकट्याने लोकसभा निवडणूक लढवून चांगले निकाल आणेल. आम्ही एकट्याने निवडणूक लढवत आहोत कारण देशाचे सर्वोच्च नेतृत्व दलितांच्या हातात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उत्तरप्रदेशमध्ये बसपा सरकारने सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय या भावनेने समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या. पण आता उदरनिर्वाहाची हमी देण्याऐवजी सरकार अल्प शिधा देऊन लोकांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारने धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली राजकारण करून लोकशाही कमकुवत करण्याचे काम केले आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोसायटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

Tur Dal Sambar Recipe: तुरीच्या डाळीचा साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा?

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT