Nylon Manja : नाशकात 3 लाख 78 हजारांचा नायलॉन मांजा जप्त,14 गुन्हे दाखल;18 विक्रेत्यांना अटक

Makar Sankranti 2024 : राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात नायलाॅन मांजा वापरणा-यांवर देखील जरब बसल्याचे दिसून आले.
nashik police seize nylon manja reels worth rs 3 lakh 78 thousand 18 arrested
nashik police seize nylon manja reels worth rs 3 lakh 78 thousand 18 arrestedsaam tv
Published On

Nashik News :

नायलाॅन मांजा (nylon manja) विक्री करणा-यांवर आणि वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नुकतेच दिलेत. त्यानूसार नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी २१ भरारी पथकांची नियुक्त केली. या पथकाने गत २० दिवसांत १४ गुन्हे दाखल करीत १८ विक्रेत्यांना अटक केली. तसेच ४१ जणांवर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती दिली. (Maharashtra News)

नायलॉन मांजामुळे माेठ्या दुर्घटना घडल्या आहेत आणि घडताहेत. त्यामुळे या मांज्यावर काही ठिकाणी बंदी आणली गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने देखील नायलाॅन माजांचा वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन विक्रेत्यांचे दुकान तसेच घर सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात नायलाॅन मांजा वापरणा-यांवर देखील जरब बसल्याचे दिसून आले.

nashik police seize nylon manja reels worth rs 3 lakh 78 thousand 18 arrested
Makar Sankranti 2024: जखमी पक्षांसाठी 'सहयोग' पक्षी चिकित्सालय, पतंगोत्सवात नायलाॅन मांजा वापरु नका; नंदुरबारवासियांना आवाहन

नायलॉन मांजामुळे पक्षांसह नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होत असल्यानं नाशिक पोलिसांकडून कडक पावलं उचलली गेली आहेत. नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी पोलिसांची २१ भरारी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नायलॉन मांजा विक्री आणि वापर प्रकरणी मागील २० दिवसांत १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १८ विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून ४१ जणांवर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती पाेलिस दलाने दिली.

पाेलिस दलाने एक्स वर सुमारे तीन लाख 78 हजार रुपयांचा बंदी असलेला नायलाॅन माजा जप्त केल्याची माहिती विषद केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

nashik police seize nylon manja reels worth rs 3 lakh 78 thousand 18 arrested
Train Cancelled List : रेल्वेकडून 6 फेब्रुवारीपर्यंत 24 गाड्या रद्द; जाणून घ्या एक्सप्रेसची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com