शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार, असा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, यावर खासदार संजय राऊत यांनी आणि ठाकरे गटाचे प्रतोद अजय चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"मातोश्रीबाहेर घातापात घडवण्याबाबत चर्चा करणारे कोणते तरुण होते, काय होते हे मला माहित आहे. आमच्याकडे सगळी माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची भाषा करणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लिम नाव घेतली, या देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे", असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
"ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातील डाऊटफुल असून ते सुडाने पेटलेलं सरकार आहे. ज्या पद्धतीने शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेला आहे. त्यामुळे भविष्यात काय घडलं तर याची जबाबदारी केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची असेल", अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी केली.
ठाकरे गटाचे अजय चौधरी यांनी देखील मातोश्रीबाहेरल घातपात घडवण्याच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना देखील अशा धमक्या आल्या होत्या. मात्र, त्यांच्या केसालाही देखील धक्का लागला नाही. कारण शिवसैनिकांचे कवच त्यांच्याभोवती होतं, असं अजय चौधरी म्हणालेत.
"शिवसैनिकांनी जशी बाळासाहेबांना सुरक्षा पोहचवली होती. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यासोबतही जनता आहे. शिवसैनिकांचे कवच उद्धव साहेबांच्या सोबत आहे. जर कोणी त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिकांचे अभद्य कवच त्यांना भेदू देणार नाही", असं चौधरी यांनी म्हटलं आहे.
"मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी कोविड काळात चांगलं काम केलंय. महाराष्ट्रातील जनतेचे प्रेम त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांना काही होणार नाही, असा विश्वास देखील चौधरी यांनी व्यक्त केला. देशात भाजपला प्रखर विरोध करणारं नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे आहेत", असंही चौधरी म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.