Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार? जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची मोठी माहिती

Mla Bacchu Kadu Latest News: "ज्या लोकांच्या कुणबी नोदीं सापडल्या आहेत, त्यांच्या राज्यांतर्गत सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे", अशी माहिती बच्चू कडूंनी जरांगे यांच्या भेटीनंतर दिली.
Mla Bacchu Kadu Meet Manoj jarange
Mla Bacchu Kadu Meet Manoj jarange Saam TV
Published On

Mla Bacchu Kadu Meet Manoj jarange

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २० जानेवारीपासून मुंबई आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्य सरकार बॅकफुटवर आलंय. अशातच महायुती सरकारला पाठिंबा देणारे अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगें यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mla Bacchu Kadu Meet Manoj jarange
Maratha Reservation: मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन फसणार? गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात धाव; याचिकेत काय मागणी?

यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. "ज्या लोकांच्या कुणबी नोदीं सापडल्या आहेत, त्यांच्या राज्यांतर्गत सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे. त्यासंदर्भात चर्चा करून सरकार पाऊल टाकणार आहे", अशी माहिती बच्चू कडूंनी जरांगे यांच्या भेटीनंतर दिली. (Latest Marathi News)

"कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच पितृसत्ताक पद्धतीतील सग्या सोयऱ्यांना शपथपत्र भरून पुरावा उपलब्ध करून दिल्यास प्रमाणपत्र देण्याचा विचार सुरू आहे", असंही बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सांगितलं आहे.

"आंदोलन झाल्यानंतर तोडगा निघत असेल तर तो आंदोलनापूर्वीच झाला पाहिजे. सगे सोयऱ्यांची व्याख्या तयार केली पाहिजे. पाच-सहा व्याख्या तयार झाल्या तर त्या प्रशासकीय बसल्या पाहिजेत. उद्या कोणी कोर्टात जाता कामा नये. हे २० तारखेपर्यंत शक्य आहे का हे चर्चा झाल्यावर कळेल", असेही कडू यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्याकडून वेळ घेण्यासाठी मी आलो नाही, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. २० तारखेला आंदोलन होणारच असून, मी आंदोलन थांबवण्यासाठी आलो नाही. मी स्वतःच आंदोलनात सहभागी होणार आहे, अशी माहिती देखील बच्चू कडू यांनी दिली आहे.

Mla Bacchu Kadu Meet Manoj jarange
Ram Mandir: २२ तारखेला मी अयोध्येत येणार नाही, असं रामाने मला स्वप्नात येऊन सांगितलंय; बड्या मंत्र्याचं विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com