सध्या वातावरणात खूप जास्त बदल होत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा विमानांना उड्डाण करण्यास वेळ लागतो. त्यामुळे फ्लाइटला उशीर होतो. परिणामी याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. असाच त्रास रविवारी इंडिगोच्या दिल्ली-गोवा फ्लाइटच्या प्रवाशांना सहन करावा लागला. त्यामुळे रागाच्या भरात एका प्रवाशाने चक्क पायलटलाच मारले. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
हवामानातीस बदलामुळे इंडिगोच्या विमानाच्या उड्डाणास विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांना तब्बल १३ तास विमानात उडकून राहावे लागले. त्यामुळे प्रवाशांची खूप जास्त चिडचिड झाली. त्यात रागात एका प्रवाशाने पायलटच्या कानाखाली मारली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Latest News)
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे उशीर होत होता. त्यामुळे पायलट विमान उशीर होत असल्याची माहिती देत होता. पायलट प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन करत आहे. याचदरम्यान अचानक एक प्रवासी उठतो आणि पायलटच्या अंगावर धावून जातो आणि त्याला मारतो. याचाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ही घटना दिल्ली विमानतळावर घडली आहे. या प्रकरणी एव्हिएशन सिक्युरीची एजन्सीने तपास सुरु केला होता. तर इंडिगोच्या पायलटला मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या फ्लाइटला उशीर झाल्याची माहिती पायलट देत होता. त्यावेळीच प्रवाशाने पायलटला मारहाण केली.
साहिल कटारिया असे या प्रवाशाचे नाव आहे. त्यानेच पायलटला मारहाण केली होती. याप्रकरणी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
दिल्लीतील हवामानबदलामुळे आणि दाट धुक्यामुळे विमानाचे उड्डाण होणे शक्य नव्हते. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत तब्बल ११० फ्लाइट्सना विलंब झाला तर ७९ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.