Weather Forecast: मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' भागात कोसळणार अवकाळी पाऊस; IMD कडून महत्वाचे अपडेट

IMD Rain Alert: ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
IMD warns of rain in Tamil Nadu Puducherry Kerala Andhra Pradesh Karnataka on Makar Sankranti 2024
IMD warns of rain in Tamil Nadu Puducherry Kerala Andhra Pradesh Karnataka on Makar Sankranti 2024Saam TV
Published On

Weather Update 15 January 2024

देशभरात थंडीचा कडाका वाढत असताना हवामानाने पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. मागील आठवड्यात देखील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं ठाकल्याने चिंता वाढली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IMD warns of rain in Tamil Nadu Puducherry Kerala Andhra Pradesh Karnataka on Makar Sankranti 2024
Munawwar Rana: शब्दांचा जादूगार हरपला! प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचं निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ऐन संक्रांतीच्या दिवशीच भारतीय हवामान विभागाने देशातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. तर काही भागात बर्फवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पुढील ४८ तासांत जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद जोरदार पाऊस होईल, असं IMD कडून सांगण्यात आलं आहे.

याशिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात ईशान्य मोसमी पाऊस थांबण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.  (Latest Marathi News)

त्यामुळे पुढील दोन दिवसांत या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस होऊ शकतो, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज

मागील आठवड्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. याचा रब्बी हंगामातील पीकांना मोठा फटका बसला होता. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील ढगाळ वातावरण निवळलं आहे. त्यामुळे पुन्हा थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत हलका पाऊस होईल, उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

IMD warns of rain in Tamil Nadu Puducherry Kerala Andhra Pradesh Karnataka on Makar Sankranti 2024
Rashi Bhavishya: नोकरीचा योग येईल, आर्थिक उलाढालीत यश मिळेल; ५ राशींचं बदलणार भाग्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com