मेहनत, जिद्द आणि इच्छा या गोष्टींच्या जोरावर माणूस आयुष्यात खूप मोठी उंची गाठू शकतो, असे म्हणतात. अशीच इच्छाशक्ती असलेल्या धारावीतील एका मुलीचे पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
धारावीतील एका मुलीला पायलट व्हायचे होते. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने स्वप्न पूर्ण करता येणार नाही, असे वाटत असतानाच एक मदतीचा हात पुढे यावा आणि चमत्कार व्हावा. असं धारावीतील नदारतसोबत घडले आहे. तिचे नशीब पालटले आहे. महिला पायलट म्हणून प्रसिद्ध असलेल्या झोया अग्रवालने एका मुलीची मदत करुन तिचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे. (Latest News)
मीडियाशी बोलताना या नदारतने सांगितले की, माझ्या आईची मी इंजिनियर व्हावी अशी इच्छा होती. पण मला पायलट व्हायचे होते. परंतु आर्थिक परिस्थिती नव्हती. मी प्लाइंग स्कूलची प्रवेश परीक्षा पास झाली तरीही आर्थिक परिस्थिती नसल्याने मला नाकरण्यात आले. झोया अग्रवाल यांना जेव्हापासून पंतप्रधान मोदींकडून 'भारत की बेटी' पुरस्कार मिळाला तेव्हापासून मला वाटत होते की, त्या मला मदत करतील. मी त्यांना माझे गुरू म्हणून स्विकारले.
त्यानंतर नदारतने एअर इंडियाच्या पायलटकडून राबवण्यात आलेल्या 'उडान परी' फाउंडेशनमधून ती शिक्षण घेतले. त्यानंतर ई-मेलद्वारे नदारतने झोयाशी संपर्क साधला. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ रोजी झोयाशी तिचे बोलणे झाले. यानंतर डिसेंबरमध्ये नदारत आणि झोयाची भेट झाली.
याबाबत झोया अग्रवाल यांनी माहिती दिली. ही फक्त सुरुवात आहे. मला प्रत्येक मुलीचे स्वप्न वास्तवात आणायचे आहे. पायलट हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येत्या १४-१५ वर्षात हे दुप्पट होणार आहे. या क्षेत्राला मुलींची गरज आहे. फक्त संसाधनांच्या कमतरतेुळे आम्ही त्यांना निराश होऊ देऊ शकत नाही, असे झोया म्हणाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.