Mumbai Political News : महाविकास आघाडीला जोरदार झटका? काँग्रेसचा बडा नेता आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता

Political News : दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत इंडिया आघाडीचा उमेदवार असल्यामुळे मिलिंद देवरा भाजप किंवा शिंदे गटातून दक्षिण मुंबईतून उमेदवार असण्याची शक्यता बोलली जात आहे.
Mahavikas Agahdi
Mahavikas Agahdi Saam tv
Published On

Mumbai Political News :

काँग्रेसचे बडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा पुढील 24 तासात शिवसेना शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत इंडिया आघाडीचा उमेदवार असल्यामुळे मिलिंद देवरा भाजप किंवा शिंदे गटातून दक्षिण मुंबईतून उमेदवार असण्याची शक्यता बोलली जात आहे. मात्र अशा सर्व चर्चा चुकीच्या असल्याचं स्वत: मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.

दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा यांची स्वतःची एक वोटबँक असल्यामुळे शिंदे गट आणि भाजपसाठी ते फायदेशीर ठरू शकतात. मनसेच्या एन्ट्रीमुळे अरविंद सावंत यांना ही लोकसभा निवडणूक अवघडत जाईल, असं मानलं जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahavikas Agahdi
Bharat Jodo Nyay Yatra : १४ राज्य, ६६ दिवस, ६७१३ किमीचा प्रवास... राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरुवात होणार

आज पक्षप्रवेश करणार?

मिलिंद देवरा आज शिंदे गटात प्रवेश करतील अशी माहिती देखील सूत्रांकडून साम टीव्हीला मिळाली आहे. दुपारी २ वाजता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश होईल, अश माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. १० माजी नगरसेवक आणि २५ पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करतील असं बोललं जात आहे.

देवरा यांना शिंदे गटाकडून अद्याप दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचे आश्वासन देण्यात आलेले नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मतदारसंघाकरता भाजपही आग्रही असल्यानं येणाऱ्या काळात मिलिद देवरा यांच्यावरुन भाजप-शिंदे गटातही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

मिलिंद देवरांनी दावे फेटाळले

मात्र मिलिंद देवरा यांनी पक्षांतराचे हे सर्व दावे फेटाळून लावले आहे. सध्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या सर्व चर्चा अफवा असल्याचं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. मी माझ्या समर्थकांसोबत चर्चा करत आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मीडिया रिपोर्ट्सवरील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्यासाठी ते काँग्रेस सोडून जात असल्याच्या सर्व अफवा आहेत . आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे कोणीही दावा करू नये, असंही मिलिंद देवरा यांनी म्हटलं.

Mahavikas Agahdi
Chhagan bhujbal: जालन्यात 200 पिस्तूल घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून रसद; मंत्री छगन भुजबळांचा खळबळजनक दावा

कोण आहेत मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. ते दक्षिण मुंबई येथून 2004 आणि 2009 मध्ये खासदार राहिले आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ते केंद्रीय राज्यमंत्री होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com