Bharat Jodo Nyay Yatra : १४ राज्य, ६६ दिवस, ६७१३ किमीचा प्रवास... राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरुवात होणार

Rahul Gandhi's Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधी रविवारी सकाळी ११ वाजता इम्फाळला पोहोचतील आणि प्रथम खोंगजोम युद्ध स्मारकाला नमन करतील. त्यानंतर यात्रेला सुरुवात करतील.
Bharat Jodo Yatra Latest News
Bharat Jodo Yatra Latest NewsTwitter/@INCIndia
Published On

Bharat Jodo Nyay Yatra :

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर लोकांचे लक्ष केंद्रित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.

मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून सुरू होणारी भारत जोडो न्याय यात्रा 15 राज्यांतील लोकसभेच्या 100 जागांवरून जाईल. मणिपूर सरकारने काँग्रेसला मर्यादित लोकांसह येथील पॅलेस मैदानातून मोर्चा काढण्यास परवानगी दिली आहे. काँग्रेसने सुरुवातीला इम्फाळ येथून प्रवास सुरू करण्याचे नियोजन केले होते, परंतु त्यासाठी मंजुरी मिळाली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bharat Jodo Yatra Latest News
Shrikant Shinde: 'मी तिकीट देऊन चूक केली', उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदे म्हणाले...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते थौबलमध्ये उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी रविवारी सकाळी ११ वाजता इम्फाळला पोहोचतील आणि प्रथम खोंगजोम युद्ध स्मारकाला नमन करतील. त्यानंतर यात्रेला सुरुवात करतील. यात्रेच्या मार्गात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फक्त सुरुवातीचं ठिकाण बदलण्यात आला आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 6713 किमी बसने आणि पायी प्रवास करेल. ही यात्रा 66 दिवस चालणार असून, 110 जिल्हे, 100 लोकसभा जागा आणि 337 विधानसभा मतदारसंघातून जाणार असून 20 किंवा 21 मार्च रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होईल.

Bharat Jodo Yatra Latest News
Maldives India Controversy: आम्हाला कोणीही उठून धमकवू शकत नाही, मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा रोख भारताकडे

कोणत्या राज्यातून किती प्रवास?

  • मणिपूरमध्ये एका दिवसात चार जिल्ह्यांमधून 107 किलोमीटरचा प्रवास.

  • नागालँडमधीळ 5 जिल्ह्यांमध्ये 257 किलोमीटरचा दोन दिवसांत प्रवास.

  • आसामच्या 17 जिल्ह्यांमध्ये 833 किलोमीटरचा प्रवास 8 दिवसांत.

  • अरुणाचल प्रदेशमध्ये 55 किमीचा प्रवास एका दिवसात.

  • मेघालयमध्ये 5 किमीचा प्रवास एका दिवसात.

  • पश्चिम बंगालमध्ये सात जिल्ह्यांमधून 523 किमीचा प्रवास 5 दिवसात.

  • बिहारमध्ये 7 जिल्ह्यांतून 425 किमीचा प्रवास 4 दिवसांत.

  • झारखंडमध्ये 8 दिवसांत 13 जिल्ह्यांमध्ये 804 किलोमीटरचा प्रवास.

  • ओडिशात 341 किलोमीटरची यात्रा चार दिवसांत चार जिल्ह्यांमध्ये.

  • छत्तीसगडमध्ये सात जिल्ह्यांतून 536 किलोमीटरचा पाच दिवसांचा प्रवास.

  • उत्तर प्रदेशात 11 दिवसांत 20 जिल्ह्यांत 1074 किलोमीटरची यात्रा.

  • मध्य प्रदेशात सात दिवसांत 9 जिल्ह्यांतून 698 किलोमीटरचा प्रवास.

  • राजस्थानमध्ये 2 जिल्ह्यात 1 दिवसात 128 किमीची यात्रा.

  • गुजरातमध्ये पाच दिवसात 7 जिल्ह्यांमध्ये 445 किलोमीटरचा प्रवास.

  • महाराष्ट्रात पाच दिवसात 6 जिल्ह्यातून 479 किलोमीटरचा प्रवास.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com