Vinod Tawde Rajya Sabha Saam TV Marathi
देश विदेश

Rajya Sabha : राज्यात आमदारकीचं तिकीट कापलं, आता विनोद तावडे खासदार होणार, वाचा

Vinod Tawde Rajya Sabha Latest News : महाराष्ट्रातून भाजपने विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आमदारकीचे तिकिट कापल्यानंतर तावडे यांना आता संसदेत पाठवून पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

Namdeo Kumbhar

BJP Rajya Sabha candidates from Maharashtra list : केंद्रीय राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या विनोद तावडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. विनोद तावडे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील भाजपचे संख्याबळ पाहता तावडेंची खासदारकी निश्चित मानली जात आहे. गेल्या काही काळापासून तावडे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होते, मात्र आता त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात (राज्यसभा) पाठवून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

तावडेंना खासदारकी का मिळाली? कारणे काय आहेत? Why BJP nominated Vinod Tawde for Rajya Sabha 2026

विनोद तावडे यांनी संघटनात्मक पातळीवर पक्षासाठी चांगले काम केले. राज्यातील आमदारकीचे तिकिट कापल्यानंतर ते केंद्रीय राजकारणात सक्रीय झाले होते. पंजाब, केरळ अन् बिहारमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील निवडणुकांमध्ये केलेल्या कामगिरीचे फळ म्हणून या उमेदवारीकडे पाहिले जात आहे. तावडे यांना उमेदवारी देऊन भाजपने महाराष्ट्रातील अनुभवी नेत्याला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात स्थान दिल्याचे बोलले जात आहे. विनोद तावडे यांच्या रूपाने महाराष्ट्राचा एक अभ्यासू चेहरा आता दिल्लीत राज्याचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.

कधी आहेत निवडणुका? वाचा वेळापत्रक - Maharashtra Rajya Sabha election full schedule March 2026

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण ६ रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामधील ४ जागा भाजपच्या वाट्याला येत आहे. या निवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ५ मार्च २०२६ पर्यंत आहे तर अर्जांची छाननी ६ मार्च रोजी केली जाईल. उमेदवारांना आपले अर्ज ९ मार्च पर्यंत मागे घेता येतील. १६ मार्च रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता विनोद तावडे यांचा विजय सुकर मानला जात आहे.

महाराष्ट्रातून कुणाला मिळाली संधी ?

महाराष्ट्रातून भाजपने ४ जणांना राज्यसभेसाठी संधी दिली आहे. मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा राज्यसभेचे तिकिट देण्यात आले आहे. तर विनोद तावडे पहिल्यांदाच राज्यसभेवर जातील. त्याशिवाय हिंगोलीचे रामराव वडकुते आणि नागपूरच्या मायाताई इवनाते यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचं नाव निश्चित झालेय. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांना संधी दिली जाईल, असे म्हटले जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगरपालिका निवडणुकीत अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची? बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला सवाल

Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

देशातील परिस्थिती किती गंभीर? सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं दिली अपडेट, पाकिस्तानला म्हटलं दलाल

Nepal: देशाला मिळणार नवे पंतप्रधान; राम नवमीच्या दिवशीच शहांचा शपथविधी

पुण्यात ड्रग्जच्या नशेसाठी फुलचंद पान, पानांआडून अमली पदार्थांची तस्करी

SCROLL FOR NEXT