BJP Leader X Bio Modi ka Parivar Saamtv
देश विदेश

Loksabha Election : 'मैं भी चौकीदार'नंतर २०२४साठी खास मोहीम! जेपी नड्डा, अमित शहांसह सर्व नेत्यांनी बदलले ट्वीटर बायो, नवी ओळख काय?

BJP Leader X Bio Modi ka Parivar: भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शहा यांच्यासह सर्व दिग्गज नेत्यांनी त्यांच्या ट्वीटर बायोमध्ये मोदी का परिवार असा बदल केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर भाजप नेत्यांनी हा बदल केला असल्याचे बोलले जात आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. ४ मार्च २०२४

BJP Leaders X Bio Updates:

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभेच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून अबकी बार ४०० पारचा नारा दिला आहे. अशातच आता भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्वीटर बायो बदलण्यास सुरूवात केली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शहा यांच्यासह सर्व दिग्गज नेत्यांनी त्यांच्या ट्वीटर बायोमध्ये मोदी का परिवार असा बदल केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर भाजप नेत्यांनी हा बदल केला असल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या नावापुढे 'मोदी का परिवार' असा उल्लेख केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी आपला ट्वीटर बायो अपडेट करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपने पलटवार केल्याचे बोलले जात आहे..

बिहारची राजधानी पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर रविवारी आयोजित 'जनविश्वास महारॅली'मध्ये आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी पंतप्रधान मोदींबद्दल भाष्य केले होते. 'नरेंद्र मोदींना स्वत:चे कुटुंब नसेल तर आम्ही काय करू. ते राम मंदिराबाबत फुशारकी मारत असतात. पण ते खरा हिंदूही नाहीत. हिंदू परंपरेत मुलाने आपल्या आईवडिलांच्या निधनानंतर आपले केस आणि दाढी काढणे आवश्यक आहे. मात्र मोदींनी हे केले नाही.. अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी तेलंगणातील आदिलाबाद येथे जाहीर सभेला संबोधित करताना लालुप्रसाद यादव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. 'माझ्या कुटुंबामुळे मला लक्ष्य करण्यात आले. पण आता सारा देश म्हणतोय की मी मोदींचा परिवार आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता भाजप नेत्यांनी त्यांच्या ट्वीटर बायोमध्ये मोदी का परिवार असा उल्लेख करत पंतप्रधानांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: हिवाळ्यात काकडी खाणे चांगले की वाईट

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

SCROLL FOR NEXT