S. Somanath Diagnosed with Cancer
S. Somanath Diagnosed with CancerSaam Tv

S. Somnath: इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान, आदित्य-एल1 मिशनच्या लॉन्चिंगदरम्यान मिळाली माहिती

S. Somanath Diagnosed with Cancer: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस सोमनाथ यांना हे कॅन्सर ने त्रस्त असल्याची बातमीस अमोर आली आहे.
Published on

S. Somanath Diagnosed with Cancer:

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस सोमनाथ यांना हे कॅन्सर ने त्रस्त असल्याची बातमीस अमोर आली आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वतः या गंभीर आजाराचा खुलासा केला. आदित्य-एल१ मिशनच्या लॉन्चिंगदरम्यानच त्यांना आपल्याला कॅन्सर आजार झाल्याची माहिती मिळाली, असं त्यांनी सांगितलं.

सोमनाथ यांनी सांगितलं की, ''चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाच्या वेळी आरोग्याशी संबंधित काही समस्या होत्या. मात्र तोपर्यंत याबाबतची स्थिती स्पष्ट झाली नव्हती. तेव्हा काहीच कळत नव्हते.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

S. Somanath Diagnosed with Cancer
Indapur Politics: इंदापुरात राजकारण तापलं! मित्रपक्षांकडून तालुक्यात फिरू न देण्याची धमकी; हर्षवर्धन पाटलांचे थेट शिंदे- फडणवीसांना पत्र

आदित्य एल-१ मिशन गेल्या वर्षी २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आलं होतं. त्यादरम्यान एस सोमनाथ यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि स्कॅनिंगमध्ये पोटात काही तरी वाढत असल्याची माहिती समोर आली. याबाबतची माहिती मिळताच ते पुढील आरोग्य तपासणीसाठी तामिळनाडूची राजधानी चेन्नईला रवाना झाले. येथे त्यांना कॅन्सर आजार असल्याचे निदान झाले.  (Latest Marathi News)

याबाबत बोलताना सोमनाथ म्हणाले की, ''कुटुंबासाठी हा धक्का होता. पण आता कॅन्सरवर उपचार घेत आहे. मला तेव्हा उपचारांबद्दल खात्री नव्हती आणि मी वेगवेगळी आरोग्य तपासणी करून घेत होतो."

S. Somanath Diagnosed with Cancer
Tata Nexon, Nexon EV, Harrier आणि Safari डार्क एडिशनमध्ये लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ते म्हणाले, ''चार दिवस रुग्णालयात घालवल्यानंतर त्यांनी पुन्हा इस्रोमध्ये सेवा सुरू केली. नियमित चाचणी आणि स्कॅनिंग केले जात आहे. मात्र आता मी पूर्णपणे बरा झालो असून मी पुन्हा काम सुरु केलं आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com